
भारतीय संघाचा दिग्गज ऑलराऊंडर युवराज सिंगनं आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. दरम्यान यावेळी त्याची पत्नी हेजल कीच आणि त्याची आई शबनम सिंग यावेळी उपस्थित होत्या.

एकेकाळी भारतीय क्रिकेट संघाचा मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणून ओळखला जाणारा युवी तरुणींमध्ये तेवढाच फेमस होता. मात्र आपल्या खऱ्या प्रेमाला मिळवण्यासाठी युवराजला तब्बल साडे चार वर्ष वाट पाहावी लागली.

युवराज आणि हेजल यांच्या पहिल्या भेटीनंतर हेजलनं तब्बल साडे तीन वर्ष युवराजला वाट पाहायला लावली. युवराजच्या सततच्या प्रयत्नांनंतरही त्याला एका कॉफी डेटला जाण्याची संधी मिळत नव्हती.

एका टिव्ही शोमध्ये युवराजनं याबाबत माहिती दिली होती. त्यानं सांगितले होते की, हेजलला कॉफी डेटवर विचारला असता, ती नेहमी त्याला नकार द्यायची. कधी कधी तर, ती हा बोलायची पण जेव्हा जायचे असेल तेव्हा तीचा फोन बंद असायचा किंवा ती युवराजचा फोनचा नाही उचलायची. यामुळं युवराज हैराण झाला होता.

त्याआधी युवराज आणि हेजल फेसबुक फ्रेण्ड होते. पण फेसबुकवरही त्याला हेजलकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. एवढेच नाही तर, युवराजनं एका लाखतीदरम्यान सांगितले होती की, हेजलनं फेसबुकवर त्याची फेंण्ड रिक्वेस्ट तब्बल तीन महिन्यांनंतर एक्सेप्ट केली होती.

त्यानंतर काही वर्षांनी त्याच्या मित्रांनी हेजल आणि युवराजची भेट घडवून आणली. नकार आणि होकारात अखेर 30 नोव्हेंबर 2016 रोजी दोघं लग्नबंधनात अडकले.




