पाकिस्तानी बशीर चाचाला मिळालं नाही तिकीट, धोनीच्या भरोशावर पोहोचला सामना बघायला!

पाकिस्तानी बशीर चाचाला मिळालं नाही तिकीट, धोनीच्या भरोशावर पोहोचला सामना बघायला!

ICC Cricket World Cup 2019 India vs Pakistan सामन्याची तिकीटे काही तासात संपली. तरीही तिकीट मिळाले नसताना बशीर चाचा भारत पाक सामना पाहण्यासाठी इंग्लंडला रवाना झाले आहेत.

  • Share this:

मॅंचेस्टर, 15 जून : ICC Cricket World Cup स्पर्धेला इंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरुवात झाली. यात सर्वांचे लक्ष ज्या लढतीकडे लागून राहिले आहे ती भारत पाकिस्तान यांच्यातील लढत 16 जूनला होणार आहे. मॅंचेस्टरला होणाऱ्या या सामन्याची तिकीटेसुद्धा काही तासात संपली. आता एका वेबसाईटवरून तिकिटांची काळ्या बाजाराप्रमाणे विक्री होत असून त्यांची किंमत 17 हजारांपासून 60 हजार रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांचे सामना पाहण्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे. तरीही या सामन्यात क्रिकेटचा एक चाहता असा आहे ज्याला तिकीट मिळाले नसताना 6 हजार किलोमीटरचा प्रवास करून मॅंचेस्टरला पोहोचला आहे. त्याने हा प्रवास केवळ भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या भरोशावर केला आहे.

(वाचा- सामना रद्द झाल्याचा गुणतालिकेत विराटसेनेला फटका, न्यूझीलंडचा फायदा)

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला वर्ल्ड कप फायनलच्या सामन्यापेक्षा मोठा म्हटलं जात आहे. दोन पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी संघातील या सामन्यासाठी पाकिस्तानचे बशीर चाचा 60 हजार किलोमीटरचा प्रवास करून इंग्लंडला पोहोचले आहेत. त्यांना चाचा शिकागो या नावानेही ओळखलं जातं. ते धोनीचे मोठे चाहते आहेत. 2011 च्या वर्ल्ड कपपासून भारत-पाक यांच्यातील सामना पाहण्यासाठी जातात. धोनी आणि बशीर चाचा यांची 2011 पासून ओळख आहे. 2011 च्या वर्ल्ड कपवेळी भारताचे नेतृत्व महेंद्रसिंग धोनीकडे होते.

(वाचा-World Cup : इंग्लंडमध्ये पंतला टीम इंडियाच्या ड्रेसिंगरूममध्ये प्रवेश बंदी!)

त्यावेळी मोहालीत पाकिस्तानविरुद्धच्या सेमीफायनलसाठी बशीर चाचांना धोनीने तिकीट मिळवून दिलं होतं. त्यानंतर आजपर्यंत भारत-पाक सामन्याचे तिकीट धोनीनेच दिलं आहे.

बशीर चाचा पाकिस्तानच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी येत असले तरी धोनीलासुद्धा ते तितक्याच उत्साहाने पाठिंबा देतात. मॅनचेस्टरला पोहोचलेले बशीर चाचा म्हणतात की, मी मॅनचेस्टरला पोहोचल्यावर पाहिलं की तिकिटासाठी 60 ते 70 हजार रुपये लोक मोजत आहेत. एवढ्यात मी अमेरिकेला जाईन. मी धोनीचं आभार मानतो की त्याने मला तिकिटासाठी संघर्ष करायला लावला नाही.

(वाचा-ICC च्या नियोजनाचा फटका, World Cup चं स्वप्न राहणार अधुरं!)

बशीर चाचा भारत पाक सामना पाहण्यासाठी येत असल्याने त्यांचाही वेगळा चाहतावर्ग तयार झाला आहे. त्यात आता सचिनचा चाहता असलेल्या सुधीरचाही समावेश आहे. बशीर चाचा आणि सुधीर या सामन्यासाठी इंग्लंडमध्ये असून दोघेही एकत्र राहत आहेत. दोघांचा एकत्र फोटोही व्हायरल होत आहे.

SPECIAL REPORT : विधानसभेसाठी राज ठाकरेंचा काय असणार आहे मेगा प्लॅन?

First published: June 15, 2019, 7:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading