ओव्हल, 09 जून : भारतीय क्रिकेट संघातील गब्बर म्हणजेच शिखर धवनने रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात शतक केलं. शिखर धवनने 109 चेंडूत 117 धावांची खेळी केली. धवनचे एकदिवसीय क्रिकेटमधील हे 17 वे शतक आहे. या शतकासह भारतीय संघाच्या नावावर विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. धवनच्या शतकी खेळीसह वर्ल्ड कपमध्ये भारतीय फलंदाजांनी 27 शतके झाली. वर्ल्ड कपमधील कोणत्याही संघाकडून करण्यात आलेल्या शतकांमध्ये ही सर्वात जास्त आहेत. ओव्हलवर सामना सुरू होण्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या नावावर वर्ल्ड कपमध्ये प्रत्येकी 26 शतके होती.
शिखर धवनचे शतक भारताकडून वर्ल्ड कपमधील 27 वे शतक ठरले. या शतकाने भारताच्या नावावर वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम नोंद झाला. भारतानंतर ऑस्ट्रेलियाचा नंबर लागतो. भारताने 27 तर ऑस्ट्रेलियाने 26 शतकं केली आहेत. तिसऱ्या क्रमांकावर लंका असून त्यांची 23 शतकं झाली आहेत. वेस्ट इंडिजने 17 तर न्यूझीलंडने 15 शतके केली आहेत. आफ्रिका, इंग्लंड आणि पाकिस्तानकडून फक्त 14 शतके झाली आहेत. वाचा- World Cup : विराट करणार सचिनची बरोबरी, एक पाऊल दूर! बेपत्ता विमानाची माहिती देणाऱ्याला 5 लाखांचं बक्षीस, यासोबत इतर महत्त्वाच्या घडा

)







