गब्बर-हिटमॅनच्या शतकी भागिदारीने मोडले दिग्गजांचे विक्रम

ICC Cricket World Cup : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शिखर धवन आणि रोहित शर्माने 127 धावांची भागिदारी केली.

  • Share this:

ICC Cricket World Cup मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात भारताचे सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्माने शतकी भागिदारी केली. ही भागिदारी करताना दोघांनीही अर्धशतके केली.

रोहित आणि धवनने केलेली शतकी भागिदारी वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची भारताकडून दुसरी मोठी भागिदारी आहे. 1999 मध्ये अजय जडेजा आणि रॉबिन सिंग यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 141 धावांची भागिदारी केली होती.

रोहित शर्मा आणि शिखर धवन ही पहिली भारतीय सलामीची जोडी आहे ज्यांनी वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी भागिदारी केली आहे. जगात फक्त तीन जोड्यांनी अशी कामगिरी केली आहे.

 दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथ आणि एबी डिव्हिलियर्सने 2007 मध्ये तर इंग्लंडच्या ग्राहम गूच आणि इयान बॉथम यांनी 1992 च्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी भागिदारी केली होती.

रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यातील ही 16 वी शतकी भागिदारी आहे. दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडनची बरोबरी केली आहे. तर भारताचे सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्या नावावर सर्वाधिक 21 शतकी भागिदारी करण्याचा विक्रम आहे.

आयसीसी एकदिवसीय स्पर्धेतील रोहित आणि धवन यांच्यातील ही सहावी शतकी भागिदारी आहे. दोघांनीही श्रीलंकेच्या दिलशान आणि कुमार संघकाराला मागे टाकलं. तर गिलख्रिस्ट आणि हेडनच्या 6 शतकी भागिदारीची बरोबरी केली.

जानेवारी 2013 नंतर रोहित आणि धवन यांनी 16 वी शतकी भागिदारी केली असून दुसऱ्या क्रमांकावर भारताचे फलंदाज आहेत. रोहित आणि विराट कोहलीने 12 शतकी भागिदारी केल्या आहेत. न्यूझीलंडचे केन विल्यम्सन आणि रॉस टेलर यांनीसुद्धा 12 वेळा अशा कामगिरी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 9, 2019 06:10 PM IST

ताज्या बातम्या