Home /News /sport /

ऑस्ट्रेलियाचा जग्गजेतेपदाचा पंच, महिला क्रिकेटरनं मोडला हार्दिक पांड्याचा विश्वविक्रम

ऑस्ट्रेलियाचा जग्गजेतेपदाचा पंच, महिला क्रिकेटरनं मोडला हार्दिक पांड्याचा विश्वविक्रम

ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. यात यष्टीरक्षक फलंदाज हिलीने तुफान फटकेबाजी करत भारतीय गोलंदाजीचे कंबरडे मोडले.

    मेलबर्न, 08 मार्च : महिला टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी अॅलेसा हिली आणि बेथ मूनी यांनी तुफान फटकेबाजी केली. दोघींनी अर्धशतकी खेळी करून संघाला 184 धावांपर्यंत पोहोचवलं. हा सामना ऑस्ट्रेलियाने 85 धावांनी जिंकला.  ऑस्ट्रेलियाची यष्टीरक्षक अॅलेसा हिलीने वेगवान अर्धशतक केलं. तिने फक्त 30 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. यासह अॅलेसाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महिला आणि पुरुष खेळाडूंना मागे टाकलं. आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत वेगवान अर्धशतकाचा विश्वविक्रम हिलीने तिच्या नावावर केला. हिलीने 192.30 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 50 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये हा सर्वाधिक स्ट्राइक रेट ठरला आहे. याबाबतीत हिलीने भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला मागे टाकलं आहे. पांड्याने 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये 176.74 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या होत्या. पांड्याने 43 चेंडूत 76 धावांची खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 185 धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताच्या सुमार क्षेत्ररक्षणामुळे ऑस्ट्रेलियानं 184 धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात एलिसा हिलीने शानदार खेळी करत भारतीय गोलंदाजांचे कंबरडे मोडले. एलिसा हिलीने 39 चेंडूत 192.31च्या स्ट्राईक रेटने 5 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 75 धावा केल्या. एलिसा आणि बेथ मूनी यांनी 115 धावांची भागीदारी केली. हे वाचा : पहिल्या 24 चेंडूत खेळाडूंनी केल्या 2 मोठ्या चूका, टीम इंडियाला पडणार महागात भारताने दीप्ती शर्माच्या तिसऱ्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर शेफाली वर्माने खतरनाक अशा एलिसा हिलीचा झेल सोडला. शेफालीने सोपा कॅच सोडल्यानंतर हिलीने याचा फायदा घेतला. त्यानंतर चौथ्या ओव्हरमध्ये राजेश्वरी गायकवाडने बेथ मूनीचा कॅच सोडला. त्यामुळं भारतानं पहिल्या 24 ओव्हरमध्ये दोन्ही सलामीवीरांना जीवनदान दिले. अखेर राधा यादवने 75 धावांवर एलिसाला बाद करत ही भागीदारी मोडली. त्यानंतर लगेचच बेथ मूनीने 41 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर दीप्ती शर्माने कर्णधार लॅनिंग आणि अ‍ॅश्ले गार्डनर यांना एकाच ओव्हरमध्ये माघारी धाडले. तर 19व्या ओव्हरमध्ये पूनम यादवने रॅचेल हेन्सला बाद केले. VIDEO : 41 वर्षांचा जहीर खान झाला सुपरमॅन! हवेत उडी मारत घेतला शानदार कॅच
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Cricket, ICC Womens World Cup

    पुढील बातम्या