जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ICC Women's T20 World Cup Final Aus W vs Ind W : पहिल्या 24 चेंडूत खेळाडूंनी केल्या 2 मोठ्या चूका, टीम इंडियाला पडणार महागात

ICC Women's T20 World Cup Final Aus W vs Ind W : पहिल्या 24 चेंडूत खेळाडूंनी केल्या 2 मोठ्या चूका, टीम इंडियाला पडणार महागात

ICC Women's T20 World Cup Final Aus W vs Ind W : पहिल्या 24 चेंडूत खेळाडूंनी केल्या 2 मोठ्या चूका, टीम इंडियाला पडणार महागात

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मेलबर्न, 08 मार्च : आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. एलिसा हिलीने आणि बेथ मूनी यांनी सलामीला येत भारताच्या गोलंदाजीचे कंबरडे मोडले. पहिल्या 24 चेंडूत भारताने 2 मोठ्या चुका केल्या. प्रथम गोलंदाजी करताना भारताने दीप्ती शर्माच्या तिसऱ्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर शेफाली वर्माने खतरनाक अशा एलिसा हिलीचा झेल सोडला. शेफालीने सोपा कॅच सोडल्यानंतर हिलीने याचा फायदा घेतला. त्यानंतर चौथ्या ओव्हरमध्ये राजेश्वरी गायकवाडने बेथ मूनीचा कॅच सोडला. त्यामुळं भारतानं पहिल्या 24 ओव्हरमध्ये दोन्ही सलामीवीरांना जीवनदान दिले. वर्ल्ड कपमध्ये भारताची ही चूक महागात पडू शकते.

जाहिरात

हिलीला जीवनदान दिल्यानंतर तिनं आक्रमक फलंदाजी करत आपले अर्धशतकही पूर्ण केले. हिलीने 30 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 176च्या स्ट्राईक रेटनं आपले अर्धशतक पूर्ण केले. भारतीय गोलंदाजांना चांगली ऑस्ट्रेलियाला अडवण्यासाठी चांगली कामगिरी करावी लागणार आहे. भारताचा फायनलपर्यंतचा प्रवास या स्पर्धेत टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली आहे. वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 17 धावांनी हरवून स्पर्धेचा विजयी शुभारंभ केला होता. त्यानंतर भारताने बांगलादेशचा 18 धावांनी पराभव केला. न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाविरुध्द टीम इंडियाला 3 धावांचा थरारक विजय मिळाला. शेवटच्या लीग सामन्यात भारताने श्रीलंकेला 7 गडी राखून पराभूत केले. उपांत्य सामन्यात इंग्लंडबरोबरचा सामना होता पण पावसामुळे हा खेळ रद्द करण्यात आला आणि गटातील टप्प्यातील सर्व सामने जिंकल्यामुळे टीम इंडियाला अंतिम सामन्याचे तिकीट मिळाले. ऑस्ट्रेलियाचा फायनलपर्यंतचा प्रवास या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात निराशाजनक होती. पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाला भारताकडून पराभव सहन करावा लागला. मात्र त्यानंतर यजमान ऑस्ट्रेलियाने कमबॅक करत श्रीलंकेला 5 विकेटनं नमवलं. तर बांगलादेशला 86 धावांनी पराभूत केले. उपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलंडवर 4 धावांनी विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. तर, सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला 5 धावांनी नमवत अंतिम सामन्यात प्रवेश केला. भारत-ऑस्ट्रेलिया यांचा रेकॉर्ड या दोन्ही संघाच्या रेकॉर्डबाबत बोलायचे झाल्यास ऑस्ट्रेलियाचा संघ भारतावर भारी पडू शकतो. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 19 सामने झाले आहेत. यात भारताने 6 तर ऑस्ट्रेलियाने 13 सामने जिंकले आहेत. पण गेल्या पाच सामन्यात भारताने 3 सामन्यात ऑस्ट्रेलियाता पराभूत केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: cricket
  • First Published :
जाहिरात
जाहिरात