मुंबई, 06 डिसेंबर : बीसीसीआयने माजी क्रिकेटपटू ऋषिकेष कानिटकर यांना भारतीय महिला क्रिकेट संघाच्या फलंदाजी प्रशिक्षक पदी नियुक्त केलं आहे. 9 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेपासून ऋषिकेश कानिटकर यांचा कार्यकाळ सुरू होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार हे महिला संघाचा भाग नसतील. त्यांच्यावर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिरकी गोलंदाजीच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रमेश पोवार बीसीसीआयच्या नव्या मोड्युलचा भाग म्हणून एनसीएचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासोबत काम करतील.
हेही वाचा : क्रिकेटला भारत-पाकिस्तान सामन्यांची गरज; रमीज राजांचा सूर बदलला
ऋषिकेश कानिटकर यांनी भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानतंर बोलताना सांगितलं की, भारताच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड होणं ही गौरवास्पद गोष्ट आहे. आपल्याकडे अनुभवी आणि तरुण खेळाडु आहेत. मला वाटतं की हा संघ आगामी आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार आहे. आपल्या समोर काही मोठ्या स्पर्धा असणार आहेत आणि येत्या काळात संघाचा आणि फलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून माझ्यासाठी एक वेगळा अनुभव असणार आहे.
हेही वाचा : वर्ल्ड चॅम्पियन ते त्रिशतकवीर! टीम इंडियाचा 5 खेळाडूंचा आज वाढदिवस
रमेश पोवार यांनी आपला महिला संघाचा प्रशिक्षक म्हणून अनुभ चांगला होता असं म्हटलं. गेल्या काही वर्षात दिग्गज आणि उदयोन्मुख खेळाडुंसोबत काम करता आलं. आता एनसीएमध्ये अनेक वर्षांच्या अनुभवाचा भविष्यातील खेळाडुंना घडवण्यासाठी मदत करण्यास वापराला मी तयार आहे. व्हीव्हीएस लक्ष्मणसोबत काम
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.