मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

वर्ल्ड चॅम्पियन ते त्रिशतकवीर! टीम इंडियाचा 5 खेळाडूंचा आज वाढदिवस

वर्ल्ड चॅम्पियन ते त्रिशतकवीर! टीम इंडियाचा 5 खेळाडूंचा आज वाढदिवस

भारतीय क्रिकेटसाठी 6 डिसेंबर हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. या दिवशी भारतीय क्रिकेटमधील 5 खेळाडूंचा वाढदिवस आहे.

भारतीय क्रिकेटसाठी 6 डिसेंबर हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. या दिवशी भारतीय क्रिकेटमधील 5 खेळाडूंचा वाढदिवस आहे.

भारतीय क्रिकेटसाठी 6 डिसेंबर हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. या दिवशी भारतीय क्रिकेटमधील 5 खेळाडूंचा वाढदिवस आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 6 डिसेंबर :  भारतीय क्रिकेटसाठी 6 डिसेंबर हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. या दिवशी भारतीय क्रिकेटमधील 5 खेळाडूंचा वाढदिवस आहे.  रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, आर. पी. सिंह आणि करुण नायर या दिग्गज खेळाडूंचा  वाढदिवस असतो. टीम इंडियातील या सर्व खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केलेली आहे. या पाच खेळाडूंपैकी तिघं टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग आहेत. ‘आज तक’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

1) रवींद्र जडेजा: टीम इंडियातील ऑल-राउंडर खेळाडू रवींद्र जडेजा आज 34 वर्षांचा झाला. 6 डिसेंबर 1988 रोजी सौराष्ट्रामध्ये जन्मलेल्या रवींद्रनं 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानं आतापर्यंत 171 वन-डे, 64 टी-20 आणि 60 टेस्ट मॅचेच खेळल्या आहेत. वन-डे क्रिकेटमध्ये जडेजानं 32.62 च्या सरासरीनं दोन हजार 447 रन्स केले आहेत. ज्यात 13 अर्धशतकांचा समावेश आहे. डावखुरा स्पिनर असलेल्या जडेजानं आंतरराष्ट्रीय वन-डे मॅचेसमध्ये 189 विकेट्स घेतल्या आहेत. 36 रन्सच्या बदल्यात 5 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

टी-20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जडेजानं 457 रन्स करून 51 विकेट्स घेतल्या आहेत. दुखापतीमुळे जडेजा नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होऊ शकला नाही. टेस्ट क्रिकेटमध्ये जडेजानं 242 विकेट्स घेतल्या असून, 48 रन्समध्ये सात विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याची बॅटिंगची आकडेवारीदेखील चांगली आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये त्यानं आतापर्यंत 36.56 च्या सरासरीनं दोन हजार 523 रन्स केले आहेत. त्यामध्ये तीन शतकं आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे.

पाकिस्तानच्या पराभवामुळे भारताला फायदा, WTCच्या फायनलमध्ये पोहोचण्याची संधी

2) जसप्रीत बुमराह: उजव्या हातानं फास्ट बॉलिंग करणारा जसप्रीत बुमराह टीम इंडियातील प्रमुख बॉलर्सपैकी एक आहे. तो आज 28 वर्षांचा झाला. 6 डिसेंबर 1993 रोजी अहमदाबादमध्ये जन्मलेला बुमराह भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळतो. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह सध्या क्रिकेटपासून दूर आहे. जसप्रीत बुमराहनं आतापर्यंत भारतासाठी 72 वन-डे, 60 टी-20 आणि 30 टेस्ट मॅचेस खेळल्या आहेत. बुमराहनं वन-डेमध्ये 24.30 च्या सरासरीने 121 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याने 20.22 च्या सरासरीनं 70 विकेट्स घेतल्या आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये बुमराहच्या नावावर 21.99 च्या सरासरीने 128 विकेट्सची नोंद आहे. सप्टेंबर 2019 मध्ये, जसप्रीत बुमराहने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये हॅट्ट्रिक केली होती. क्रिकेटच्या दीर्घ फॉरमॅटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा तो फक्त तिसरा भारतीय बॉलर आहे.

3) श्रेयस अय्यर: उत्कृष्ट बॅट्समन असलेला श्रेयस अय्यर आज 28 वर्षांचा झाला. श्रेयस अय्यरनं भारतासाठी आतापर्यंत 49 टी-20, 37 वन-डे आणि पाच टेस्ट मॅचेस खेळल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये, श्रेयसने 30.67 च्या सरासरीनं एक हजार 43 रन्स केलेले आहेत. ज्यामध्ये सात अर्धशतकांचा समावेश आहे. वन-डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्यानं 48.52 च्या सरासरीनं एक हजार 452 रन्स केले आहेत. यामध्ये दोन शतकं आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये श्रेयसनं 46.88 च्या सरासरीने 422 रन्स आहेत. श्रेयसनं गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पदार्पणाच्या टेस्ट मॅचमध्ये शानदार शतक झळकवलं होतं. टेस्ट क्रिकेटमध्ये श्रेयसनं आतापर्यंत एक शतक आणि तीन अर्धशतकं झळकावली आहेत.

राहुल द्रविडची मुख्य प्रशिक्षकपदावरून उचलबांगडी होणार? BCCIच्या हालचाली सुरू

4) आर. पी. सिंह: रायबरेली येथे जन्मलेला आर पी सिंह आज 37 वर्षांचा झाला. उत्तर प्रदेशमधील या फास्ट बॉलरनं आपल्या क्रिकेट कारकिर्दीची धमाकेदार सुरुवात केली होती. 2006 मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या फैसलाबाद टेस्ट मॅचमध्ये आर. पी.ला पदार्पणाची संधी मिळाली होती. पहिल्याच मॅचमध्ये त्याला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार मिळाला होता. 2007 मध्ये, पहिल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताला चॅम्पियन बनवण्यात आरपीनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. आरपीनं 14 टेस्ट मॅचमध्ये 40 विकेट्स घेतल्या आहेत. 59 रन्सच्या बदल्यास पाच विकेट्स ही त्याची टेस्ट क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. याशिवाय त्याने 58 वन-डे मॅचेसमध्ये 69 आणि 10 टी-20 मॅचेसमध्ये 15 विकेट्स घेतल्या आहेत. क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतल्यानंतर आरपी सिंह कॉमेंट्री करत आहेत.

5) करुण नायर: जोधपूरमध्ये जन्मलेला करुण नायर मूळचा कर्नाटकचा आहे. 31 वर्षांचा करुण नायर हा वीरेंद्र सेहवागनंतर टेस्ट क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा दुसरा भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याला फारशी संधी मिळाली नाही. 2017 पासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्यानं कारकिर्दीतील तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये त्रिशतक झळकावलं होतं. मात्र, त्यानंतर तो केवळ तीन टेस्ट मॅचेस खेळू शकला. नायरनं सहा टेस्ट मॅचेसमध्ये 62.33 च्या सरासरीने 374 रन्स केले आहेत. याशिवाय, तो भारतासाठी दोन वन-डे मॅचेसही खेळला आहे. ज्यामध्ये त्याने एकूण 46 रन्स केले. आयपीएल 2022 मध्ये तो राजस्थान रॉयल्स टीममध्ये होता.

First published:

Tags: Cricket news, Jasprit bumrah, On this Day, Ravindra jadeja, Shreyas iyer