मुंबई, 15 ऑक्टोबर: यंदा ऑस्ट्रेलियात क्रिकेटचा सर्वात लोकप्रिय फॉरमॅट अर्थात टी20 चा वर्ल्ड कप खेळवला जात आहे. 2007 पासून 2020 पर्यंत 7 वेळा टी20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदा आठव्यांदा आयसीसी टी20 वर्ल्ड कपचं आयोजन केलं जात आहे. आतापर्यंत दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, भारत आणि यूएईत या वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदा पहिल्यांदाच टी20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे.
ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच टी20 वर्ल्ड कप
कांगारुंच्या देशात टी20 वर्ल्ड कपचं आयोजन होण्याची ही पहिलीच वेळ आहे. महत्वाची बाब म्हणजे ऑस्ट्रेलियन संघ गतविजेता आहे. कांगारुंनी गेल्या वर्षी न्यूझीलंडला हरवून पहिल्यांदाच टी20 वर्ल्ड कप पटकावला होता. त्यामुळे वर्ल्ड कपची ही ट्रॉफी आपल्याकडेच राखण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न राहील. त्यात घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियन संघाची नेहमीच दादागिरी चालते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकू शकते असा अनेकांचा अंदाज आहे. पण टी20 वर्ल्ड कपबाबतची एक गोष्ट मात्र नेमकी याच्या विरुद्ध आहे. ती म्हणजे आजवर कोणत्याही यजमान देशानं टी20 वर्ल्ड कप जिंकलेला नाही.
हेही वाचा - T20 World Cup: 16 टीम्स, 45 सामने, एक ट्रॉफी... पाहा भारतात किती वाजता सुरु होणार टी20 वर्ल्ड कपचे सामने?
यजमान देश आणि विजेते
2007, दक्षिण आफ्रिका - भारत विजयी
2009, इंग्लंड - पाकिस्तान विजयी
2010, वेस्ट इंडिज - इंग्लंड विजयी
2012, श्रीलंका - वेस्ट इंडिज विजयी
2014, बांगलादेश - श्रीलंका विजयी
2016, भारत - वेस्ट इंडिज विजयी
2020, यूएई - ऑस्ट्रेलिया विजयी
2022, ऑस्ट्रेलिया - ?
त्यामुळे आगामी वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियन संघ याला अपवाद ठरणार की स्पर्धेला नवा विजेता मिळणार? हे पाहणं महत्वाचं ठरेल.
Who will join this elusive list of teams at #T20WorldCup 2022? pic.twitter.com/89imaivXYP
— T20 World Cup (@T20WorldCup) October 15, 2022
हेही वाचा - T20 World Cup: बुमराऐवजी शमीला घेतलं, पण महामुकाबल्यात खेळवणार? रोहितनं दिली 'ही' अपडेट
भारत दुसऱ्या विजेतेपदाच्या शोधात
2007 साली महेंद्रसिंग धोनीच्या टीम इंडियानं पहिल्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर पुढे एकदाही भारतीय संघाला टी20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. 2014 साली टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली होती. पण श्रीलंकेसमोर भारतीय संघाला उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलं होतं. यंदा रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया दुसऱ्या विजेतेपदाच्या निर्धारानं ऑस्ट्रेलियात पोहोचली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sports, T20 cricket, T20 world cup 2022