मुंबई, 24 फेब्रुवारी : : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये गुरुवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमी फायनलचा पहिला सामना पारपडला. या सामन्यात भारताचा 5 धावांनी पराभव झाला असून यामुळे भारताचं महिला टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याच स्वप्न पुन्हा भंग पावलं. परंतु भारताला विजय मिळून देण्यासाठी कर्णधार हरमनप्रीत कौरने कडवी झुंज दिली. परंतु धावबाद झाल्यामुळे तिची ही झुंज अपयशी ठरली आणि भारत टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडला. भारताच्या पराभवानंतर महिला संघाची माजी कर्णधार अंजुम चोप्रा हिने हरमनप्रीतला मिठी मारली. यानंतर हरमन खूपच भावुक होऊन तिला अश्रू अनावर झाले. विराट ठेवतोय सचिनच्या पावलावर पाऊल, अलिबागमध्ये घेतला अलिशान बंगला, पाहा काय आहे किंमत भारताची कर्णधार हरमनप्रीत आजारी असूनही ती सेमी फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाशी दोन हात करण्यासाठी मैदानात उतरली. भारताच्या स्टार फलंदाज एका मागोमाग एक बाद होत असताना हरमन संघासाठी मैदानात टिकून राहिली. मात्र अखेर 52 धावा करून ती धावबाद झाली. हरमनप्रीत नंतर कोणतीही खेळाडू भारतासाठी मोठी डाव संख्या करू शकली नाही आणि भारताचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला. या केवळ 5 धावांमुळे हातातून विजय निसटल्यामुळे सर्वच खेळाडू भावुक झाले. याच वेळी समालोचनासाठी उभी असलेली भारतीय संघाची माजी कर्णधार अंजुम चोप्राने हरमनला घट्ट मिठी मारली. माजी कर्णधाराच्या या भावनिक मिठीमुळे हरमनप्रीत भावुक झाली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागेल.
याप्रसंगाबद्दल बोलताना अंजुम म्हणाली की, “मी फक्त हे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करत होती. आम्हा दोघांसाठी हा भावनिक क्षण होता. भारताने अनेकदा उपांत्य फेरी गाठली आहे आणि त्यात अनेकदा पराभव पत्करावा लागला आहे. मी पहिल्यांदाच हरमनप्रीतला अशी फलंदाजी करताना पाहिले आहे. मी तिला तिच्या दुखापतींशी आणि प्रकृतीशी झुंजताना पाहिलं आहे आज ती कदाचित खेळलीही नसती, पण कारण हा सेमीफायनाचा सामना होता त्यामुळे तिने आपल्या आजारपणाला मागे टाकून भारतासाठी खेळली. पराभवानंतर हरमनप्रीत कोणत्या परिस्थितीतून जात असेल हे मी समजू शकतो. तिच्यासोबतचा तो क्षण प्लेअर-टू-प्लेअर मधला होता”. सध्या हरमनप्रीत आणि माजी कर्णधार अंजुम चोप्रा यांच्यातील भावनिक क्षणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयसीसीने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.