मुंबई, 24 फेब्रुवारी : भारताचा जगप्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली हा सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत व्यस्त आहे. विराटची लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढत असून त्याच्या उत्पन्नातही यामुळे मोठी वाढ झाली आहे. आता सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री आणि इतर बॉलिवूड कलाकारां पाठोपाठ विराटने देखील महाराष्ट्रातील निसर्गरम्य ठिकाण अलिबाग येथे आलिशान बंगला खरेदी केला आहे. नुकतेच अलिबागच्या प्रशासकीय कार्यालयात या मालमत्तेची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पारपडली. विराट कोहलीला देखील अलिबागच्या निसर्ग सौंदर्याची भुरळ पडली असून त्याने आवास लिव्हिंग अलिबाग एलएलपी यांच्या बंगलो प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केली आहे. विराट कोहलीने 6 कोटींना हा बंगला खरेदी केला असून गुरुवारी २३ फेब्रुवारी रोजी अलिबाग दुय्यम निबंधक कार्यालयात विराटच्या वतीने त्याचा भाऊ विकास कोहलीने खरेदी व्यवहार पूर्ण केला. त्यामुळे आता सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री, इशांत पंत, अजित वाडेकर इत्यादींप्रमाणे विराट देखील आता अलिबागकर झाला आहे. 2 हजार स्क्वेअर फुटचा आलिशान बंगला : विराटने आवास लिव्हिंग अलिबाग एलएलपी यांच्या बंगलो प्रोजेक्टमध्ये तब्बल 2 हजार स्क्वेअर फुटचा अद्ययावत बंगला खरेदी केला आहे. यात 400 स्क्वेअर फुटचा स्विमिंग पूल देखील असून बंगला अद्ययावत सोयीसुविधा तसेच फर्निचरनी युक्त आहे. याची किंमत सुमारे 6 कोटी असल्याची माहिती आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.