पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने नुकतंच लग्न केलं. त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रौफच्या लग्नानंतर त्याच्या चाहत्यांनी पत्नी मुजना मसूद मलिकबद्दल सर्च केलं आहे. ती कोण आहे? दोघे भेटले कुठे? यांची उत्तरं चाहते शोधत आहेत. दरम्यान, हारिस रौफने ट्विटरवरून त्याच्या पत्नीचं सोशल मीडियावर अधिकृत अकाउंट नसल्याचं सांगितंल आहे. हारिस रौफने ट्विट करत म्हटलं की, हॅलो, मी फक्त एवढंच स्पष्ट करू इच्छितो की माझी पत्नी मुजना मसूद मलिक कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाही. तिचं कोणतंही अधिकृत अकाउंट नाही. कृपया कोणत्याही स्कॅमपासून सावध रहा. तुम्हा सर्वांच्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी खूप खूप आभार. हेही वाचा : भारत क्रिकेट खेळत नसता तर… ; अश्विनने श्रीलंकेच्या चाहत्याला सुनावलं
काही मीडिया रिपोर्टसनुसार रौफची पत्नी मुजना मसूद मलिक ही फॅशन मॉडेल असून सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सरसुद्धा आहे. मुजनाचे इन्स्टाग्राम अकाउंट असून त्यावर ५० हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. जेव्हा हारिस रौफ आणि मुजना यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले तेव्हा मुजनाने तिचे अकाउंट पब्लिक होतं ते प्रायव्हेट केलं आहे. मात्र रौफने पत्नीचं सोशल मीडियावर अकाउंट नसल्याचं म्हटलंय. हेही वाचा : आफ्रिदी चीफ सिलेक्टर होताच माजी क्रिकेटपटूने उडवली खिल्ली, शेअर केला फोटो मुजनाच्या हातावर मेंहदी लावलेले फोटो खूप व्हायरल झाले होते. या मेहंदीमध्ये HR150 असं लिहिण्यात आलं होतं. हारिस रौफ १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करतो. त्यामुळे मुजनाने हातावरील मेहंदीत HR150 लिहिलं होतं.