मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs NZ: पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर का भडकला हार्दिक पंड्या? मॅच संपल्यानंतर पाहा काय घडलं...

Ind vs NZ: पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर का भडकला हार्दिक पंड्या? मॅच संपल्यानंतर पाहा काय घडलं...

हार्दिक पंड्या

हार्दिक पंड्या

Ind vs NZ: मालिकाविजयानंतर आज नेपियरमध्ये कॅप्टन हार्दिक पंड्या पत्रकारांना सामोरा गेला. यावेळी एका पत्रकारानं विचारलेल्या प्रश्नावर हार्दिक पंड्या चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

नेपियर, 22 नोव्हेंबर: भारत आणि न्यूझीलंड संघातला तिसरा टी20 सामना डकवर्थ लुईस नियमानुसार टाय अवस्थेत संपला. त्यामुळे भारतानं तीन सामन्यांची मालिका 1-0 अशा फरकानं खिशात घातली. या मालिकाविजयानंतर आज नेपियरमध्ये कॅप्टन हार्दिक पंड्या पत्रकारांना सामोरा गेला. यावेळी एका पत्रकारानं विचारलेल्या प्रश्नावर हार्दिक पंड्या चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला.

पत्रकाराचा तो प्रश्न आणि...

एका पत्रकारानं पत्रकार परिषदेदरम्यान पंड्याला संजू सॅमसन आणि उमरान मलिकला संधी न देण्यावरुन प्रश्न केला. त्यावर हार्दिकनं उत्तर दिलं... 'कोण काय बोलतं यावरुन या स्टेजला पोहोचल्यानंतर काही फरक पडत नाही. कोच आणि मला जे ठिक वाटेल आणि जी टीम आम्हाला हवी असेल आम्ही त्यांनाच प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळवू' असं रोखठोकपणे पंड्या म्हणाला.

पण त्यानंतर त्यानं राखीव खेळाडूंना खेळवण्याविषयी देखील प्रतिक्रिया दिली. 'अजून खूप वेळ आहे, सगळ्यांना संधी मिळणार आणि त्यांना जास्तीत जास्त संधी दिली जाईल. सीरीज मोठी असते तेव्हा जास्त मॅचेस मिळतात. पण ही छोटी सीरीज होती, मॅचेस कमी होत्या त्यामुळे प्लेईंग इलेव्हनमध्ये जास्त बदल करण्यावर माझा विश्वास नाही आणि यापुढेही मी असं कधी करणार नाही.

हेही वाचा - Team India: भर मैदानात टीम इंडियाच्या खेळाडूंनी उमरान मलिकला का मारलं? Video Viral

टी20 नंतर वन डे मालिका

दरम्यान न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेनंतर आता भारतीय संघ यजमान संघाविरुद्ध वन डे मालिका खेळणार आहे. पण या मालिकेसाठी टीममध्ये बरेच बदल होणार आहेत. हार्दिक पंड्या या मालिकेत खेळणार नाही. वन डे टीमची धुरा शिखर धवनकडे असेल. येत्या 25 नोव्हेंबरला या मालिकेतील पहिला सामना ऑकलंडमध्ये खेळवण्यात येणार आहे. उभय संघात एकूण तीन वन डे सामने खेळवले जाणार आहेत.

First published:

Tags: Sports, T20 cricket, Team india