Home /News /sport /

'शास्त्री बोलघेवडे, दोन खेळाडूंना संघातून बाहेर काढा', हरभजन सिंगचं मोठं वक्तव्य

'शास्त्री बोलघेवडे, दोन खेळाडूंना संघातून बाहेर काढा', हरभजन सिंगचं मोठं वक्तव्य

भारताचा फिरकीपटू हरभजनसिंगने भारतीय संघ फक्त बोलण्यात पटाईत आहे तर कामगिरी काही वेगळंच सांगते असं म्हटलं आहे.

    नवी दिल्ली, 03 मार्च : न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाचा लाजीरवाणा पराभव झाला. यानंतर टीम इंडियाच्या कामगिरीवर टीका केली जात आहे. भारताचा फिरकीपटू हरभजनसिंगने भारतीय संघ फक्त बोलण्यात पटाईत आहे तर कामगिरी काही वेगळंच सांगते असं म्हटलं आहे. हरभजन सिंगने संघातील तीन खेळाडूंच्या स्थानावरूनही प्रश्न उपस्थित केला. हरभजन सिंगने एका मुलाखतीत सांगितलं की,'पृथ्वी शॉ धावा करतो पण त्याची शैली पाहिली की वाटतं तो कधीही बाद होई शकतो. त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. शुभमन गिल संघात पहिल्यापासून होता त्याला संधी दिली नाही. पृथ्वी शॉ थेट आला आणि त्याला  खेळायला दिलं. टीम इंडिया दोन्ही युवा फलंदाजांना त्यांचा वेळ देत नाही. गिलला सोबत ठेवलं असलं तरी संधी मात्र दिलेली नाही.' पृथ्वी शॉसह पंतच्या स्थानावरूनही हरभजन सिंगने प्रश्न विचारला आहे. ''पंत फॉर्ममध्ये नव्हता तर साहाला संघातून बाहेर का ठेवलं. पंतला साहाच्या जाही संधी दिली. त्याचं कारण नाही माहिती. पंतची कामगिरीही खराब आहे. त्यानं सराव सामन्यातही चांगल्या धावा केल्या नव्हत्या.'' भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीवरूनही टीका केली. हरभजन सिंग म्हणाला की, 'जगातील सर्व संघांना रहाणेचं गुपित माहिती झालं आहे. त्याला शॉर्ट बॉल खेळता येत नाही त्यामुळे आता तो जिथंपण खेळायला जाईल तिथं शॉर्ट बॉल टाकून त्याला अडचणीत आणलं जाईल. हरभजन सिंगने भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावरही निशाणा साधला. शास्त्रींनी केलेला दावा फोल ठरल्याचं हरभजन सिंग म्हणाला. रवी शास्त्रींचा दावा मी मान्य करत नाही. ते त्यांचं स्वत:चं  मत आहे. आता फरक एवढाच आहे की, पहिल्यांदा आम्ही इकॉनॉमी क्लासने जात होतो आता फर्स्ट क्लासमध्ये परदेशी दौऱ्यावर जातात. रेकॉर्ड वेगळं दिसत असतानाही ते बोलघेवडेपणा करत आहेत. हे वाचा : ...आणि धावांसाठी झगडणाऱ्या विराटने त्याच्या लहानपणीच्या प्रशिक्षकांना केला फोन भारताने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात गेल्या चार पैकी तीन मालिका गमावल्या आहेत. यात फक्त ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकली होती. त्यातही ऑस्ट्रेलियाच्या संघात वॉर्नर आणि स्मिथ नव्हते. या चार मालिकेत 14 पैकी 9 सामन्यात भारताचा पराभव झाला आहेत. हे वाचा : दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून विराट बाहेर? रोहित ऐवजी 'या' खेळाडूकडे कर्णधारपद
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Harbhajan singh, Ravi shastri

    पुढील बातम्या