मुंबई, 18 मार्च : भारत पाकिस्तान यांच्या क्रिकेट बोर्डात सध्या आशिया कप 2023 वरून वाद सुरु आहे. यंदाच्या आशिया कप पूर्वीच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानचा दौरा करणार नाही असे सांगितले होते. तर यावर प्रत्युत्तरात पाकिस्तानचा क्रिकेट संघ देखील भारताचा दौरा करणार नाही असे पाकिस्तनाच्या क्रिकेट बोर्डाने सांगितले होते. तेव्हा दोन्ही देशांमध्ये वाद सुरु असतानाच आता भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंह यांने एक मोठं वक्तव्य केलंय.
भारताचा दिग्गज क्रिकेटर हरभजन सिंह याने एका वृत्तपत्राला मुलाखत देत असताना आशिया कप 2023 विषयी आपले मत मांडले. हरभजन सिंह म्हणाला, 'भारतीय संघाने पाकिस्तानात जाऊ नये कारण तिथे जाणे सुरक्षित नाही. तिथल्या लोकांना आपल्याच देशात सुरक्षित वाटत नसताना आपण तिथे जाण्याचा धोका का पत्करतोय?' बीसीसीआयने पाकिस्तानमध्ये होणारा आशिया चषक वगळला तर भारताला त्याचा फरक पडणार नाही. पाकिस्तान क्रिकेटला भारताची गरज आहे, पण भारताला क्रिकेटसाठी पाकिस्तानची गरज नाही", असे परखड मत हरभजन सिंह याने व्यक्त केले.
IND vs AUS 1st ODI : 'नाटू नाटू' गाण्याने किंग कोहलीलाही लावलं वेड! भर मैदानात केली धम्माल स्टेप
काय आहे नेमकी प्रकरणं?
आशिया कप 2023 चे आयोजन पाकिस्तान येथे करण्याचे निश्चित झाले होते. परंतु बीसीसीआयचे अध्यक्ष जय शहा यांनी भारताचा संघ पाकिस्तनचा दौरा करणार नाही अशी भूमिका घेतली आहे. तर यावर PCB या पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने देखील यावर ठोस भूमिका घेत भारत जर सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा करणार नसेल तर पाकिस्तानचा संघ देखील वनडे वर्ल्ड खेळण्यासाठी भारताचा दौरा करणार नाही असे सांगितले. यावरून सध्या दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डात वाद सुरु आहे. आता लवकरच यावर तोडगा काढण्यासाठी मार्च महिन्यात आयसीसीचे बैठक पारपडणार आहे. यांनंतरच आशिया चषकाचे आयोजन कोणत्या देशात होणार याबाबत निर्णय घेण्यात येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Cricket, Cricket news, Harbhajan singh, India vs Pakistan, Pakistan Cricket Board