मुंबई, 18 मार्च : RRR चित्रपटातील ऑस्कर पुरस्कार प्राप्त 'नाटू नाटू' या गाण्याने सर्वांनाच वेड लावले आहे. सध्या सोशल मीडियावर हे गाणं प्रचंड व्हायरल होत असून या गाण्याचा फिव्हर टीम इंडियाच्या आजी माजी खेळाडूंवरही चढलेला पाहायला मिळाला. काही दिवसांपूर्वी माजी क्रिकेटर सुनील गावस्कर, रवी शास्त्री यांनी 'नाटू नाटू' गाण्याची सिग्नेचर स्टेप केली होती. तर आता विराट कोहलीला ही 'नाटू नाटू' वर थिरकण्याचा मोह आवरला नाही. शुक्रवारी भर मैदानात विराटने केलेला डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात काल वनडे मालिकेतील पहिला सामना पारपडला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 5 विकेट्सने धूळ चारून पहिला सामना जिंकला. यासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यादरम्यान कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीमुळे टीम इंडियाने 188 धावांवर ऑस्ट्रेलियाला ऑल आउट केले. यावेळी मैदानावर क्षेत्ररक्षण करत असलेला विराट कोहली अचानकपणे 'नाटू नाटू' गाण्याची स्टेप करताना कॅमेरात कैद झाला.
#KingKohli dancing to #NaatuNaatu #RRRWinsOscar #RRRMoive #ViratKohli #RamCharan #JrNTR#SSRajamouli #MMKeeravani #Oscars #Oscars95 pic.twitter.com/UsB7e5bfn5
— Avis Trilochana (@ClanofGriffin) March 17, 2023
विराटचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याचे चाहते व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, India vs Australia, Virat Kohli, Wankhede stadium