जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Happy Birthday MS Dhoni : जबरदस्त! महेंद्र सिंह धोनीच्या 41 व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी उभारला 41 फुटांचा CUTOUT, चाहत्यांच्यात संचारला जोश

Happy Birthday MS Dhoni : जबरदस्त! महेंद्र सिंह धोनीच्या 41 व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी उभारला 41 फुटांचा CUTOUT, चाहत्यांच्यात संचारला जोश

Happy Birthday MS Dhoni : जबरदस्त! महेंद्र सिंह धोनीच्या 41 व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी उभारला 41 फुटांचा CUTOUT, चाहत्यांच्यात संचारला जोश

आपल्या देशात क्रिकेटचं वेड सर्व वयोगटातील लोकांना आहे. त्यात तेंडुलकर आणि धोनीचे चाहते जगभरात आहेत. उद्या (7 जुलै) धोनीचा 41 वा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने चाहत्यांनी चक्क 41 फुटांचा कटआऊट उभा केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 6 जून : भारतीय क्रिकेट टीममधील सर्व कर्णधारांपैकी महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. त्याचा उद्या (7 जुलै) 41 वा वाढदिवस (Happy Birthday MS Dhoni) आहे. त्यामुळे देशभरातील चाहते आतापासूनच 40-40 फुटांचे कटआऊट लावून जबरदस्त सेलिब्रेट करण्याच्या तयारीत दिसत आहेत. परंतु, धोनी यंदाचा वाढदिवस लंडनमध्ये साजरा करण्याची शक्यता आहे. सध्या तो आपल्या कुटुंबासोबत लंडनमध्ये आहे. तसेच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली उद्या इंग्लंड विरूद्ध असणाऱ्या टी-20 ची सीरिजदेखील खेळायची आहे. वाचा :  काय सांगता काय? ग्रॅज्युएशन नंतर ‘या’ क्षेत्रांमध्ये करिअर कराल तर पैशांचा पडेल पाऊस; लगेच व्हाल सेटल धोनीच्या चाहत्यांनी त्याच्या वाढदिवसानिमित्त खास तयारी केलेली दिसत आहे. विजयवाडा येथे धोनीचा 41 फूट काटआऊट लावण्यात आला आहे, यामध्ये धोनी आपल्या हेलिकाॅप्टर शाॅट मारताना दिसत आहे. एका चाहत्याने त्या कटआऊटचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. हजारो युजर्सनी त्या पोस्टला लाईकदेखील केलेले आहे. चाहत्यांनी धोनीचा कटआऊट लावण्याची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही 2018 मध्ये केरळ राज्यात 35 आणि चेन्नईमध्ये 30 फुटांचा कटआऊट लावण्यात आला होता.  महेंद्र सिंह धोनीने 2 दिवसांपूर्वीच लग्नाचा 12 वा वाढदिवस साजरा केला होता. 4 जुलै 2010 रोजी धोनीचे लग्न झालेले होते.

जाहिरात

20 मे रोजी खेळला होता शेवटची मॅच 40 वर्षांच्या धोनीने शेवटची मॅच 20 मे 2022 रोजी खेळली होती. त्यावेळी तो पिवळ्या रंगाच्या जर्सीवर दिसून आला होता. पण, ती मॅच 5 विकेट्सनी हारलेली होती. 2021 मध्ये महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली टीमने चौथी आयपीएल ट्राॅफी आपल्या नावावर केलेली होती. तो आता पुढच्या वर्षी टीमचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. कारण धोनीनेच सांगितले होते की, “2023 च्या सीजनमध्ये CSK कडून खेळणार आहे.”

ICC च्या 3 ट्राॅफीज जिंकणारा एकमेव कर्णधार भारतीय टीमध्ये सर्वात सक्सेस कर्णधार म्हणून धोनीकडे पाहिले जाते. आपल्या कारकिर्दीत त्याने 3 ICC टुर्नामेंट जिंकलेली आहेत. यामध्ये 2007 टी-20 वर्ल्डकप, 2011 मध्ये वन-डे वर्ल्डकप आणि 2013 मध्ये चॅम्पियन ट्राॅफी जिंकलेली होती. धोनीच्या कारकिर्दीत भारत टेस्ट रॅंकिंगमध्ये टाॅपवर होता. धोनीने 15 ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्ती घेतली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात