Home /News /sport /

IND vs SA : 'या दोन खेळाडूंना अजून टीममध्ये जागा मिळणार नाही', द्रविडचा इशारा

IND vs SA : 'या दोन खेळाडूंना अजून टीममध्ये जागा मिळणार नाही', द्रविडचा इशारा

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) हा सीनियर खेळाडू चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांना जेवढं शक्य आहे तेवढा काळ टीममध्ये ठेवण्यासाठी आग्रही आहे.

    जोहान्सबर्ग, 7 जानेवारी : टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) हा सीनियर खेळाडू चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांना जेवढं शक्य आहे तेवढा काळ टीममध्ये ठेवण्यासाठी आग्रही आहे. यामुळे हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांना आणखी काही काळ टीमबाहेर राहावं लागणार आहे, असे संकेतच राहुल द्रविडने दिले आहेत. आपल्या धैर्यपूर्ण आणि ठोस बॅटिंगमुळे लक्ष वेधून घेतलेल्या हनुमा विहारीने त्याच्या 13 पैकी फक्त एकच मॅच भारतात खेळली आहे. कर्णधार विराट कोहलीच्या पाठीला दुखापत झाल्यामुळे आणि श्रेयस अय्यरचं पोट खराब झाल्यामुळे विहारीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या जोहान्सबर्ग टेस्टमध्ये (India vs South Africa 2nd Test) खेळण्याची संधी मिळाली. हनुमा विहारीने दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद 40 रनची खेळी करून आपली उपयुक्तता सिद्ध केली. यानंतर राहुल द्रविडनेही त्याचं कौतुक केलं. 'विहारीने दोन्ही इनिंगमध्ये चांगली कामगिरी केली. पहिल्या इनिंगमध्ये नशीबाने त्याला साथ दिली नाही. उत्कृष्ट कॅचमुळे तो आऊट झाला. दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने चांगली बॅटिंग केली आणि टीमचं मनोबल वाढवलं,' असं द्रविड म्हणाला. 'श्रेयस अय्यरने तीन मॅचआधी अशीच कामगिरी केली. जेव्हा त्याला संधी मिळाली, त्याचा फायदा त्याने उचलला. त्याचीही वेळ येईल अशी आशा मी करतो,' अशी प्रतिक्रिया द्रविडने दिली. द्रविडच्या या बोलण्याचा अर्थ म्हणजे केप टाऊन टेस्टमध्ये रहाणे आणि पुजाराला प्राथमिकता दिली जाईल, कारण कोहली पुढच्या सामन्यात पुनरागमन करेल, हे निश्चित आहे. 'जे खेळाडू सध्या वरिष्ठ आहेत, त्यांनाही वाट पाहावी लागली होती. त्यांनी आपल्या करियरच्या सुरुवातीला बऱ्याच रन केल्या होत्या. असं क्रिकेटमध्ये होतं, खेळाची ही प्रकृतीच आहे. विहारीने ज्या पद्धतीने बॅटिंग केली, त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला असेल, तसंच टीमचं मनोबलही वाढलं पाहिजे,' असं वक्तव्य द्रविडने केलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ajinkya rahane, Hanuma vihari, Pujara, Rahul dravid, Shreyas iyer, Team india

    पुढील बातम्या