ठाणे, 19 फेब्रुवारी : भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी सध्या क्रिकेटपासून दूर आहे. तो पुन्हा मैदानात कधी दिसणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. धोनी जिथे जाईल तिथं चाहते गर्दी करतात. आता त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. बुधवारी ठाण्यामध्ये धोनी एका जाहिरातीच्या शूटिंग साठी आला होता. तो आल्याची माहिती मिळताच लोकांची गर्दी झाली. या गर्दीतून वाट काढत गाडीपर्यंत पोहोचणं धोनीला कठीण झालं. त्यावेळी धोनीला गर्दीतून गाडीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याची हेअरस्टायलिस्ट मैत्रिण सपना भावनानीने मदत केली. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सपना भावनानीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती धोनीला गर्दीपासून वाचवताना दिसत आहे. या व्हिडिओत धोनी गर्दीच्या मधोमध असून सपना त्याच्या पुढे चालताना दिसते. चालताना ती हात पसरून चालत आहे. बॉडीगार्ड ज्याप्रमाणे गर्दी बाजूला सारतात तसंच ती करताना दिसते. त्याचवेळी काही लोक धोनीसोबत सेल्फी घेण्यासाठी पुढे येतात तेव्हा सपना त्यांना मागे ढकलते. सपनाने व्हिडिओ शेअर करताना म्हटलं की, 90 टक्के सुरक्षा, 10 टक्के हेअरस्टाइल आणि 500 टक्के फॅनगिरी.
धोनी त्याच्या खेळासोबत स्टाइलसाठी ओळखला जातो. सुपरबाइक्स, कार यांचीही धोनीला आवड आहे. त्याची हेअरस्टाइलसुद्धा खास अशी आहे. आयपीएलच्या आधी धोनी त्याची हेअरस्टाइलमध्ये चेंज करतो. ही हेअरस्टाइल सपना भावनानी करते. धोनीच्या स्पाइक्स, मोहॉक हेअरस्टाइल आजही चाहत्यांच्या लक्षात आहेत. वाचा : टी-20मधून निवृत्ती घेणार विराट? पहिल्यांदाच कॅप्टन कोहलीनं केला खुलासा धोनीनं जुलै 2019नंतर एकही क्रिकेट सामना खेळलेला नाही. मात्र आता धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे कारण धोनीच्या पुनरागमनाची तारीख जाहीर झाली आहे. धोनी आता वर्ल्ड कप 2019नंतर थेट आयपीएलच्या तेराव्या हंगामात खेळताना दिसणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रविवारी 29 मार्च रोजी 8 वाजता वानखेडे मैदानावर होणाऱ्या सामन्यात धोनी दिसेल. वाचा : दुहेरी शतक झळकवणाऱ्या खेळाडूला विराट देणार नाही संधी!

)







