मुंबई, 23 जुलै: आपल्या देशात गुरू- शिष्य परंपरेला मोठं महत्त्व आहे. आषाढ पौर्णिमेला (Ashadh Purnima) दरवर्षी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते. या दिवशी आपल्या गुरुंचा आदर आणि त्यांच्याबद्दल असलेले प्रेम व्यक्त करण्यात येते. यावर्षी गुरुपौर्णिमा शुक्रवारी (23 जुलै) रोजी साजरी होत आहे. या निमित्तानं सर्व जण आपल्या गुरुबद्दल वेगवेगळ्या माध्यमातून आदर व्यक्त करत आहेत. मास्टर - ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) देखील या दिवशी त्याचे क्रिकेटमधील पहिले गुरु रमाकांत आचरेकर सरांच्या (Ramakant Achrekar) आठवणीनं भावुक झाला आहे. सचिन तेंडुलकरनं एक खास व्हिडीओ शेअर करत आचरेकर सरांना वंदन केलं आहे. ’ आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आचरेकर सरांच्या घरी गेलो होतो. सर्व जुन्या आठवणी जाग्या झाल्या. माझ्या आयुष्यात त्यांचे असलेले योगदानबद्दल मला त्यांचे कधी आभार मानता आलेच नाहीत,’ अशी भावुक प्रतिक्रिया सचिननं व्यक्त केली आहे.
Visited Achrekar Sir’s home today to pay my respects to him on #GuruPurnima. All memories came rushing back. Can’t thank him enough for his contribution in my life. pic.twitter.com/FuHyNCA3aA
— Sachin Tendulkar (@sachin_rt) July 23, 2021
मुंबईतील शारदाश्रम शाळेतमध्ये सचिन तेंडुलकरनं आचरेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवले आहे. सचिनसह विनोद कांबळी, प्रवीण आम्रे, संजय बांगर, बलविंद सिंग संधू, चंद्रकांत पंडित, लालचंद राजपूत, समीर दिघे, अजित आगरकर आणि रोमेश पवार या सर्व टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूंना आचरेकर सरांनीच घडवले आहेत. IND vs SL: 41 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती, Dravid-Dhawan जोडीचा मोठा निर्णय भारतीय क्रिकेटमधील असमान्य योगदानाबद्दल आचरेकरांचा पद्मश्री पुरस्कारानं देखील गौरव करण्यात आला. 2019 साली वयाच्या 87 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.