प्रसिद्ध गोल्फपटू टायगर वूड्स भीषण कार अपघातात जखमी, हॉस्पिटलमध्ये दाखल
जगप्रसिद्ध गोल्फपटू टायगर वूड्स (Tiger Woods) एका भीषण कार अपघातामध्ये (Car Accident) जखमी झाले आहेत. या अपघातानंतर वूड्स यांची कार बाहेर काढण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले.
मुंबई, 24 फेब्रुवारी : जगप्रसिद्ध गोल्फपटू टायगर वूड्स (Tiger Woods) एका भीषण कार अपघातामध्ये (Car Accident) जखमी झाले आहेत. त्यांच्या एजंटनं दिलेल्या माहितीनुसार, वूड्स यांच्या पायाला अनेक ठिकाणी फॅक्चर झालं आहे. लॉस एंजलिस (Los Angeles) मध्ये हा कार अपघात झाला. हा अपघात भयंकर होता. या अपघातानंतर वूड्स यांची कार बाहेर काढण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले, अशी माहिती लॉस एंजलिसच्या काउंटी शेरीफ विभागानं दिली आहे.
टायगर वूड्स यांना या कार अपघातामध्ये अनेक ठिकाणी जखमा झाल्या. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथं त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली. या अपघातामध्ये त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं. स्थानिक वेळेनुसार मंगळवारी सकाळी 7.15 मिनिटांनी हा अपघात झाला. वूड्स यांची भरधाव कार दुभाजकावर धडकल्यानंतर पलटली. यावेळी कारमध्ये वूड्स एकटेच होते. त्यांच्या कारचा एक भाग रस्त्याच्या एका बाजूला दूरवर फेकला गेला.
Pictures are being broadcast in LA of the car in which Woods was travelling. It appears to be a Genesis Invitational courtesy vehicle, from the tournament he has just hosted pic.twitter.com/swwwUCF9FZ
BREAKING: Tiger Woods transported to hospital with injuries following vehicle crash with "major damage," LA County Sheriff's Dept. says. pic.twitter.com/hxcGYAig8D
टायगर वूड्स यांचा जगातील सर्वश्रेष्ठ गोल्फपटूंमध्ये समावेश होतो. त्यांनी आजवर 15 प्रमुख गोल्फ चॅम्पियनशीप जिंकल्या आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून दुखापतीनं ग्रस्त होते. पाठदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी त्यांनी जानेवारी महिन्यातचं पाचवं ऑपरेशन केलं होतं. या ऑपरेशननंतर ते लवकरच गोल्फ कोर्सवर पुनरागमन करणार होते. मात्र आता या अपघातानंतर त्यांचं पुनरागमन बराच काळ लांबण्याची शक्यता आहे.