Home /News /sport /

अटलांटिक महासागर पार करत केला नवा विक्रम; प्रवासादरम्यान फस्त केलं 40 किलो चॉकलेट

अटलांटिक महासागर पार करत केला नवा विक्रम; प्रवासादरम्यान फस्त केलं 40 किलो चॉकलेट

ब्रिटनमधील उत्तर यॉर्कशायरच्या थर्स्कमधील 21 वर्षीय स्विमिंग शिक्षिका असणाऱ्या जॅस्मिन हॅरिसन यांनी अटलांटिक महासागर एकटीने बोटीतून पार करत नवा विक्रम केला आहे.

थर्स्क,23 फेब्रुवारी : ब्रिटनमधील उत्तर यॉर्कशायरच्या थर्स्कमधील 21 वर्षीय स्विमिंग शिक्षिका असणाऱ्या जॅस्मिन हॅरिसनने अटलांटिक महासागर एकटीने बोटीतून (Rowing) पार करत नवा विक्रम केला आहे. 2018 मध्ये झालेल्या या स्पर्धेतून तिला प्रेरणा मिळाल्यानंतर तिने टॅलिस्कर व्हिस्की अटलांटिक चॅलेंजमध्ये (Talisker Whisky Atlantic Challenge) भाग घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिला 70 दिवसांचा कालावधी लागला. या संपूर्ण प्रवासात ती 2 तास बोटीमधून अंतर पार करत होती, तर 2 तास विश्रांती घेत होती. या संपूर्ण प्रवासात तिचा जगाशी संपर्क तुटला होता. पण सॅटेलाईट फोनच्या मदतीने ती दररोज आपल्या आईबरोबर संपर्कात होती. द गार्डियन वृत्तपत्राशी बोलताना सर्वात आधी तिला जमिनीवर पाय ठेवताच तिला कशाची आठवण आली असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तिने अन्न असं उत्तर दिलं. या संपूर्ण प्रवासात तिला खाद्यपदार्थांची खूप आठवण आल्याचं म्हटलं. तिला अटलांटिक महासागरातील हा प्रवास पूर्ण करण्यासाठी 70 दिवस 3 तास आणि 48 मिनिटांचा कालावधी लागला. तिने कॅनरी बेटांमधील स्पेनच्या ला गोमेरा येथून आपल्या प्रवासाला सुरुवात केली आणि शनिवारी अँटिगा येथे ही मोहीम पूर्ण केली. या संपूर्ण मोहिमेदरम्यान तिने केवळ चॉकलेट (Chocklate) आणि बिस्किटांवर (Biscuit) दिवस काढल्याचंही सांगितलं. या संपूर्ण प्रवासात एकूण 40 किलो चॉकलेट खाल्ल्याचं तिनं सांगितलं. (वाचा : Explained: जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती पसरवतात अधिक प्रदूषण?) या संपूर्ण प्रवासादरम्यान ती 12 तास बोटिंग करत असे. यादरम्यान ती जेवणासाठी, आराम करण्यासाठी आणि बोट स्वच्छ करण्यासाठी विश्रांती घेत होती. पाऊस पडायला लागल्यानंतर ती विश्रांती घेत होती. जवळपास 100 मैलांचं अंतर पार केल्यानंतर पुन्हा बोट चालवण्यास सुरुवात केली असता तिला दुखापत झाल्याचं लक्षात आलं. तिच्या डाव्या कोपराला दुखापत झाल्याचं लक्षात आल्यानंतर तिने आपल्या सुरक्षा अधिकाऱ्यांना याविषयी माहिती दिली. ती स्वत:च्या अटींवर आणि एकांताच्या उद्देशाने तिचा प्रवास करण्याचा दृढनिश्चय होता. हॅरिसनला कोविडच्या तणावातून आणि एकाकीपणापासून दूर राहण्यास देखील मदत झाली. या संपूर्ण प्रवासादरम्यान तिला अनेक समुद्री जीव दिसले. व्हेल, ट्रिगरफिश, एक पट्टी असलेली मर्लिन, डॉल्फिन्स आणि पायलट फिश यांसारखे समुद्री जीव पाहण्याची तिला संधी मिळाली. (वाचा : OMG! हरणाच्या डोळ्यात उगवले केस; पाहून पशुतज्ज्ञही हादरले) या प्रवासात तिने एकदा धबधब्याजवळ पोहचल्यानंतर ब्रिटिश ध्वज उंचावत मोहीम फत्ते झाल्याचं दर्शवलं. तिच्या या मोहिमेतील कामगिरीमुळे तिचं नाव रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवलं गेलं आहे. या मोहिमेदरम्यान चॅरिटीसाठी 10,000 युरोपेक्षा जास्त रक्कम देखील जमा केली आहे. हॅरिसनआधी अमेरिकेच्या केटी स्पॉट्ज या 22 वर्षीय तरुणीने ही कामगिरी केली होती. तिने वयाच्या 22 व्या वर्षी पूर्वेकडून पश्चिमेकडील अटलांटिक महासागर पार केला होता. दरम्यान, याआधी ही कामगिरी करणारी लूकस हेटझ्मन ही सर्वात तरुण व्यक्ती ठरली होती.  वयाच्या 18 व्या वर्षी 2019 मध्ये लूकस हेटझ्मनने ही कामगिरी केली होती. हॅरिसनने आतापर्यंत एकूण 16,000 डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम शेल्टरबॉक्स आणि ब्लू मरीन फाउंडेशनसाठी जमा केले आहेत.
Published by:Aiman Desai
First published:

Tags: World record

पुढील बातम्या