नवी दिल्ली, 6 जानेवारी: भारताच्या दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणेने(Ajinkya Rahane) सर्वाधिक 58 धावा केल्या. त्याने पुजारासोबत मिळून 111 धावांची भागीदारी केली. त्याच्या या कामगिरीनंतरही माजी क्रिकेट गौतम गंभीरने(Gautam Gambhir) अजिंक्यला संघाबाहेर ठेवण्याची मागणी केली आहे.
दुसऱ्या कसोटीत (IND vs SA) भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर 240 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. रहाणेने दुसऱ्या डावात 58 धावा केल्या. तो संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. दुखापतीमुळे विराट कोहली दुसऱ्या कसोटीत खेळत नाहीये. अशा परिस्थितीत तो तिसऱ्या कसोटीत फिट झाला तर प्लेइंग-11 मध्ये बदल निश्चित आहे. भारतीय संघ सध्या मालिकेत 1-0 ने पुढे आहे.
दरम्यान, गौतम गंभीरने आपले परखड मत व्यक्त केले आहे. अजिंक्य रहाणेने अर्धशतकी खेळी केली असली, तरी केपटाउन कसोटीत त्याच्याजागी हनुमा विहारीला संधी मिळाली पाहिजे, असे गंभीरने मत व्यक्त केले आहे.
अजिंक्य रहाणे चांगला खेळला, यात दुमत नाही. पण भविष्याचा विचार केला, हनुमा विहारीची कामगिरी बघितली तर त्याला सुद्धा संधी मिळाली पाहिजे. असे मत व्यक्त करत विहारी एकच फॉरमॅट खेळतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धही त्याने चांगली कामगिरी केली होती. तुम्हालाही पुढचा विचार करावा लागेल. असे मत स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गंभीरने व्यक्त केले.
विहारीने दुसऱ्या डावात नाबाद 40 धावा केल्या. संघाने 228 धावांत 8 विकेट गमावल्या. त्यानंतर विहारीने चांगली खेळी खेळून धावसंख्या २६६ धावांपर्यंत नेली. पहिल्या डावातही त्याने 20 रन केल्या आहेत.
तर नंबर-3 स्पेशलिस्ट 'या' जागेवर पुजाराला संधी द्या
तसेच, त्याने पुजारासंदर्भातही यावेळी भाष्य केले. गौतम गंभीर म्हणाला की, नंबर-3 ऐवजी स्पेशालिस्टची जागा आहे. त्यामुळे माझ्या मते, पुजाराच्या कामगिरीची तुलना रहाणे बरोबर केली जाऊ शकत नाही. पुजाराला आणखी एका कसोटी मालिकेत संधी दिली पाहिजे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.