जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / फिफा वर्ल्ड कप कोण जिंकणार? ब्राझीलनंतर ६० वर्षांनी फ्रान्सला इतिहास घडवण्याची संधी

फिफा वर्ल्ड कप कोण जिंकणार? ब्राझीलनंतर ६० वर्षांनी फ्रान्सला इतिहास घडवण्याची संधी

फिफा वर्ल्ड कप कोण जिंकणार? ब्राझीलनंतर ६० वर्षांनी फ्रान्सला इतिहास घडवण्याची संधी

गतविजेत्या फ्रान्सला सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आहे. दुसऱ्या बाजूला फिफा वर्ल्ड कप फायनल मेस्सीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरचा सामना असणार आहे. त्यामुळे मेस्सीचा अर्जेंटिना संघ विजेतेपदासाठी मैदानात उतरेल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 17  डिसेंबर : अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात रविवारी फिफा वर्ल्ड कपचा अंतिम सामना होणार आहे. दोन्ही संघ याआधी प्रत्येकी दोन वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. गतविजेत्या फ्रान्सला सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आहे तर फिफा वर्ल्ड कप फायनल मेस्सीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरचा सामना असणार आहे. त्यामुळे मेस्सीचा अर्जेंटिना संघ विजेतेपदासाठी मैदानात उतरेल. जर फ्रान्सच्या संघाने विजेतेपद कायम राखलं तर ते विक्रम नोंद करतील. अर्जेंटिनाने पहिल्यांदा 1978 मध्ये विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर 1986 मध्ये पुन्हा वर्ल्ड चॅम्पियन झाले होते. तर फ्रान्सने 1998 मध्ये विजेतेपद पटकावलं होतं. तर दुसऱ्यांदा 2018  मध्ये ते वर्ल्ड कप जिंकले होते. आता अंतिम सामना जिंकून सलग दुसऱ्यांदा जगज्जेता होण्याचं त्यांचं स्वप्न आहे. हेही वाचा :  एका बेटावर आहे मेस्सीचं आलिशान घर, किंमत वाचून थक्क व्हाल फ्रान्सने जर पुन्हा वर्ल्ड कप जिंकला तर ते ब्राझीलचा 60 वर्षे जुना विक्रम मोडतील. पाचवेळा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ब्राझीलने 1958 नंतर 1962 मध्येही फिफा वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर कोणताही संघ सलग विजेतेपद जिंकू शकलेला नाही. तसंच सलग दोन वेळा वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी करणारा फ्रान्स तिसरा संघ ठरू शकतो. ब्राझीलच्या आधी सर्वात पहिल्यांदा इटलीने ही कामगिरी केली होती. इटलीच्या फुटबॉल संघाने 1934 आणि 1938 मध्ये सलग दोन वेळा विजेतेपद पटकावलं होतं. हेही वाचा :  फायनलआधी मेस्सीच्या दुखापतीने वाढवली अर्जेंटिनाचा चिंता, सरावाला न आल्याने चर्चा फ्रान्सचा संघ फिफा वर्ल्ड कप जिंकला तर त्यांचे प्रशिक्षक दिदिएर हेसुद्धा त्यांच्या कारकिर्दीत मोठी कामगिरी करतील. 1938 नंतर दोन वर्ल्ड कप जिंकून देणारे ते पहिले प्रशिक्षक बनतील. याआधी इटलीचे विटोरियो पॉजो यांनी 1934 आणि 1938 मध्ये ही कामगिरी केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात