पत्नीला कोरोनाचा धोका, सचिनच्या नावाने पैसे गोळा करतोय न्यूझीलंडचा क्रिकेटपटू

पत्नीला कोरोनाचा धोका, सचिनच्या नावाने पैसे गोळा करतोय न्यूझीलंडचा क्रिकेटपटू

न्यूझीलंडच्या माजी क्रिकेटपटू त्याच्या पत्नीला कोरोनापासून वाचवण्यासाठी सचिनच्या नावाचा वापर करून पैसे मागत आहे.

  • Share this:

ख्राइस्टचर्च, 26 मार्च : कोरोना व्हायरसमुळे जगातील सर्वच देशांमधील नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. दरम्यान, न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू इयान ओ ब्रायन याच्यासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. तो पत्नीपासून दूर असून इच्छा असतानाही तो तिच्याकडे जाऊ शकत नाही. ओ ब्रायन त्याच्या कुटुंबासह ब्रिटनमध्ये राहतो. काही दिवसांपूर्वी कामानिमित्त तो न्यूझीलंडला आला. त्याचवेळेत कोरोनामुळे अशी स्थिती निर्माण झाली की तो तिथंच अडकून पडला. आता त्याला घरी परत जाण्यासाठी लोकांकडून पैसे मागण्याची वेळ आली आहे.

ओ ब्रायनच्या परतीच्या प्रवासासाठीचे विमान उड्डाण रद्द झाले. त्यामुळे तिकिटासाठी पैसे द्यावेत यासाठी सोशल मीडियावर आवाहन केलं आहे. त्यानं ट्विट करून म्हटलं की, ब्रिटनमध्ये जाण्यासाठी तो पैशांची सोय कऱण्याचा प्रयत्न करत आहे. जर कोणी स्काइक किंवा व्हिडिओ कॉलवर क्रिकेट, राजकारणी, खाद्यपदार्थ, सचिन तेंडुलकर, मानसिक आरोग्य यावर बोलू इच्छित असेल आणि त्याबदल्यात काही डॉलर देऊ शकत असेल तर मी तयार आहे.

इयान ओ ब्रायनची पत्नी आणि दोन्ही मुलं ब्रिटनमध्ये राहतात. ओ ब्रायनला काळजी असण्याचं कारण म्हणजे त्याच्या पत्नीच्या फुफ्फुसाला संसर्ग झाला आहे. 43 वर्षीय इयान ओ ब्रायनने सांगितलं की, माझ्या पत्नीच्या जीवाची काळजी आहे. कारण तिला फुफ्फुसाचा त्रास आहे. हा व्हायरस तिच्यासाठी धोकादायक ठरू शकतो.माझ्या पत्नीसोबत माझी दोन मुलं आणि तिची आई आहे. पत्नीची आई 80 वर्षांची असल्याचीह ओ ब्रायनने सांगितलं आहे.

हे वाचा : घरातच थांबा! कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पोलिसांनी वापरला धोनीचा वेदना देणारा फोटो

न्यूझीलंडकडून ओ ब्रायननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 22 कसोटी आणि 10 एकदिवसीय सामने खेळले आहेत. याशिवाय त्यानं 4 टी20 सामनेही खेळले आहेत. कसोटीमध्ये त्याच्या नावावर 73 विकेट आहेत.

हे वाचा : Coronavirus : भारतीय क्रिकेटपटूंना जमलं नाही ते फेडररनं करून दाखवलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 26, 2020 09:24 PM IST

ताज्या बातम्या