भारतीय क्रिकेटपटूंना जमलं नाही ते फेडररनं करून दाखवलं, कोरोनाग्रस्तांसाठी केली इतक्या कोटींची मदत

भारतीय क्रिकेटपटूंना जमलं नाही ते फेडररनं करून दाखवलं, कोरोनाग्रस्तांसाठी केली इतक्या कोटींची मदत

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक दिग्गज व्यक्ती सरसावल्या आहेत. भारतातील काही उद्योजकांनी मदत जाहीर केली.

  • Share this:

बासेल, 25 मार्च : कोरोनामुळे जगातील अनेक देश संकटात सापडले आहेत. वेगानं पसरत चाललेल्या या व्हायरसमुळे जनजीवन अक्षरश: ठप्प झालं आहे. कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक दिग्गज व्यक्ती सरसावल्या आहेत. भारतातील काही उद्योजकांनी मदत जाहीर केली होती. क्रीडा क्षेत्रातून आतापर्यंत फुटबॉलपटू रोनाल्डो आणि टेनिस स्टार फेडरर यांनीच मदत केली आहे. अद्यापतरी भारतीय क्रिकेटपटू किंवा खेळाडूंनी मदतीसाठी पुढाकार घेतलेला नाही. टेनिस स्टार रॉजर फेडरर आणि त्याची पत्नी मिरका यांनीही कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबियांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.फेडररनं एक मिलियन स्विस फ्रँक डोनेट केले आहेत. भारतीय चलनात ही रक्कम 7 कोटी 76 लाख रुपये इतकी होते.

फेडररने याची माहिती देताना म्हटलं की, सध्या जग कोरोनाशी लढत आहे. सध्याच्या काळात सर्वांनीच पुढे यावं या मदतीसाठी मागे राहू नये. हा सर्व जगासाठी आव्हानात्मक काळ आहे. मिर्का आणि मी वैयक्तिक पातळीवर निर्णय घेत मदत केली आहे. आमच्याकडून देण्यात आलेली मदत ही फक्त एक सुरुवात आहे. आपण आआशा करूया की आणखी लोक एकत्र येऊन गरज असलेल्या कुटुंबाला आधार देतील. सर्वजण मिळून या संकटावर मात करू. निरोगी रहा असंही फेडररनं म्हटलं.

पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोनेही कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यानं तीन आयसीयु युनिटची मदत केली आहे. यामुळे रुग्णांवर उपचारासाठी आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण कमी झाला.

कोरोनामुळे अनेक क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या तर काही स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. टोक्यो ऑलिम्पिकसुद्धा वर्षभर पुढे ढकलण्यात आलं आहे. याबाबत आयओसीच्या प्रमुखांनीही माहिती दिली. सध्या करोनापासून वाचण्यासाठी सर्वांचा लढा सुरू आहे. सर्वजण मिळून करोनावर मात करू असं आय़ओसीने सांगितलं.

कोरोना व्हायरस चीनमधून जगभर पसरला. त्यानंतर आतापर्यंत या व्हायरसची 4 लाख 25 हजारांपेक्षा जास्त लोकांना लागण झाली आहे. तर 15 हजारांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. यात चीन, इटली आणि इराणमध्ये मोठी जिवितहानी झाली आहे. इटलीमध्ये सर्वाधिक वेगानं याचा प्रसार झाला.

हे वाचा : कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सज्ज झाला भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारा क्रिकेटपटू

First published: March 25, 2020, 8:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading