मीरपूर, 05 डिसेंबर : भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशच्या शेवटच्या जोडीने भारताच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला. भारताच्या पराभवावर माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने निवड समितीवर ताशेरे ओढले आहेत. भारतीय संघाने आक्रमक दृष्टीकोन स्वीकारला पण परिस्थितीनुसार खेळ केला नाही असं जडेजाने म्हटलं आहे. तसंच हे पुन्हा होऊ शकतं असा इशाराही दिला.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने भारतीय संघाचा एक गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाला बांगलादेशने १८६ धावात रोखले होते. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशने हे आव्हान ४६ षटकात ९ गडी गमावत विजय मिळवला.
हेही वाचा : बांगलादेशविरुद्ध पराभवानंतर ICCचा भारताला आणखी एक दणका, रोहितने मान्य केली चूक
बांगलादेशची अवस्था ९ बाद १३६ अशी झाली होती. तेव्हा सामना भारताच्या बाजूने आहे असं दिसत होतं. पण दहाव्या गड्यासाठी बांगलादेशची शेवटची जोडी मेहदी हसन मिराज आणि मुस्तफिजूर रहमान यांनी नाबाद ५१ धावंची भागिदारी केली. दोघांनी बांगलादेशला अविश्वसनीय वाटणारा विजय मिळवून दिला.
जडेजाने निवड समितीवर निशाणा साधताना म्हटलं की, भारतीय संघात एकापाठोपाठ प्रयोग करण्यात येताय. रोटेशन पॉलिसीच्या नावावर दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. एखाद्याला संधी दिली तर त्याला तीन सामन्यानंतर बाहेर बसवणं कितपत योग्य? यावर संघ व्यवस्थापनाने विचार करायला हवा. तुम्ही फक्त वऱ्हाडी गोळा करताय असंही जडेजाने सुनावलं.
हेही वाचा : बेन स्टोक्सच्या चक्रव्यूहात पाकिस्तानचे फलंदाज असे अडकले, पाहा VIDEO
वर्ल्ड कपच्याआधी तुम्ही कसे खेळायचे ठरवले तर आज जी अवस्था आहे तसे होईल.बांगलादेशची गोलंदाजी चांगली होती. मात्र असे नाही की एखाद्या गोलंदाजाने तुम्हाला बाद केले. तुम्ही बचावात्मक खेळला नाही. तुम्ही फक्त आक्रमक पवित्र ठेवला. तुमच्या तळातल्या फलंदाजांना २० टक्के सुद्धा खेळायला शिल्लक ठेवलं नाही. तुम्ही कसं खेळायचं हे आधीच ठरवलंय, मात्र हे सोपं नाही. तुम्हाला खेळाचा आदर करायला हवा असंही जडेजा म्हणाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bangladesh, Cricket, India, Team india