मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /'विराटमुळे रोहित शर्माला टेस्टमध्ये नेतृत्व करणं कठीण होणार नाही', गौतम गंभीरचं महत्त्वाचं विधान

'विराटमुळे रोहित शर्माला टेस्टमध्ये नेतृत्व करणं कठीण होणार नाही', गौतम गंभीरचं महत्त्वाचं विधान

'माजी कॅप्टन विराट कोहलीने (Virat Kohli) त्याच्या कारकिर्दीत टीम इंडियाची बॉलिंगची ताकद चांगली विकसित केली असल्यानं टेस्ट मॅचसाठीचा टीम इंडियाचा नवीन कॅप्टन रोहित शर्मासाठी यशस्वी होणं फारसं कठीण नसेल,' असं मत माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यानं व्यक्त केलं आहे.

'माजी कॅप्टन विराट कोहलीने (Virat Kohli) त्याच्या कारकिर्दीत टीम इंडियाची बॉलिंगची ताकद चांगली विकसित केली असल्यानं टेस्ट मॅचसाठीचा टीम इंडियाचा नवीन कॅप्टन रोहित शर्मासाठी यशस्वी होणं फारसं कठीण नसेल,' असं मत माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यानं व्यक्त केलं आहे.

'माजी कॅप्टन विराट कोहलीने (Virat Kohli) त्याच्या कारकिर्दीत टीम इंडियाची बॉलिंगची ताकद चांगली विकसित केली असल्यानं टेस्ट मॅचसाठीचा टीम इंडियाचा नवीन कॅप्टन रोहित शर्मासाठी यशस्वी होणं फारसं कठीण नसेल,' असं मत माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यानं व्यक्त केलं आहे.

पुढे वाचा ...

  मुंबई, 04 मार्च: 'माजी कॅप्टन विराट कोहलीने (Virat Kohli) त्याच्या कारकिर्दीत टीम इंडियाची बॉलिंगची ताकद चांगली विकसित केली असल्यानं टेस्टसाठी टीम इंडियाचा नवीन कॅप्टन म्हणून रोहित शर्मासाठी (Rohit Sharma) फारसं कठीण नसेल,' असं मत माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यानं व्यक्त केलं आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या टेस्ट सिरीजला (India vs Sri Lanka Mohali Test) आज (4 मार्च) मोहाली इथं सुरुवात झाली असून, रोहित शर्माकडे टेस्ट क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून पूर्ण वेळ जबाबदारी सोपवली जाण्याची ही सुरुवात आहे. या पार्श्वभूमीवर गौतम गंभीर याचं हे विधान महत्त्वाचं आहे.

  रेड बॉल क्रिकेटमध्ये (Red Ball Cricket) रोहित शर्मासाठी जिंकणं हे मोठं आव्हान असेल असं मला वाटत नाही, हे आपलं मत स्पष्ट करताना गंभीर यानं बॅट्समन बॉलरच्या मदतीनेच टीमला यश मिळवून देतात, बॅट्समन फक्त मॅच किंवा खेळ सेट करतात या लोकप्रिय गृहीतकाचा पुनरुच्चार केला. 'टीम इंडियाकडे वेगवान बॉलर जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यांच्यासह अनुभवी स्पिनर रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन असल्यानं भारताची फळी मजबूत आहे, असा विश्वास त्यानं व्यक्त केला. एका प्री-मॅच शोमध्ये तो बोलत होता.

  हे वाचा-पंतची स्पेशल इनिंग! कोहलीची प्रतीक्षा लांबली, टीम इंडियाची दमदार सुरूवात

  गंभीर म्हणाला, 'अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना अलीकडे टीममधून वगळण्यात आलं असलं तरी हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यरसारखे खेळाडू त्यांची जागा घेऊ शकतात. श्रेयस अय्यरने न्यूझीलंडविरुद्ध पदार्पणातच सेंच्युरी झळकावून टेस्ट क्रिकेटच्या कारकिर्दीची दमदार सुरुवात केली आहे. विहारीने भारतासाठी आतापर्यंत मिळालेल्या मर्यादित संधींमध्ये चांगली कामगिरी केली आहे.'

  'जेव्हा तुमच्याकडे अश्विन, जडेजा, शमी, बुमराह असतो, तेव्हा जिंकणं कठीण होत नाही. बॉलर तुम्हाला मॅच जिंकवून देतात. बॅट्समन (Batsman) फक्त खेळ सेट करतात. विराट कोहलीने भारताची बॉलर्सची फळी चांगली मजबूत केली आहे, त्यामुळे मला वाटत नाही, की लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये रोहित शर्मासाठी यश मिळवणं कठीण ठरेल,' असं गंभीरनं आवर्जून नमूद केलं.

  'कोणत्याही कॅप्टनसाठी घरच्या मैदानावर नेतृत्व करणं सोपं आहे. कारण टॉस जिंकल्यास प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे तुम्ही खेळ सेट करू शकता. परदेशात परिस्थिती आव्हानात्मक असते. त्यामुळे तिथल्यापेक्षा भारतात जिंकणं तुलनेनं सोपं असतं,' असंही गौतम गंभीर यानं सांगितलं.

  हे वाचा-Women's World Cup : शेवटच्या ओव्हरमध्ये ड्रामा, यजमान टीमला पराभवाचा धक्का!

  ही टेस्ट भारतासाठी दोन कारणांमुळे महत्त्वाची आहे. एक म्हणजे ही विराट कोहलीची 100वी टेस्ट (Virat Kohli's 100th Test) आहे. ही ऐतिहासिक कामगिरी करणारा तो बारावा भारतीय खेळाडू ठरला आहे. ही टेस्ट अविस्मरणीय ठरावी यासाठी तो आपला सर्वोत्कृष्ट खेळ करेल याकडे सर्वांचे डोळे लागले होते.  या खास कामगिरीसाठी विराटचा सुरूवातीला सत्कार करण्यात आला. विराटच्या शतकाकडं डोळे लावून बसलेल्या फॅन्सची निराशा झाली. मोहाली टेस्टमध्ये रंगात आलेला विराट 45 रन काढून आऊट झाला. विराट ज्या पद्धतीनं आऊट झाला ते पाहून अनेक फॅन्सचा डोळ्यावर विश्वास बसला नाही.श्रीलंकेचा स्पिनर लसिथ एबुलदेनियानं बॉल बॅकफुटवर खेळण्याचा विराटचा प्रयत्न फसला. त्याला काही कळण्याच्या आता बॉल विराटच्या बॅटला चकवून स्टंपला लागला होता.

  दरम्यान मोहालीमध्ये झालेल्या आजच्या दिवसाच्या सुरुवातीमुळे टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून रोहित शर्मा प्रदीर्घ कारकीर्द करण्याची शक्यता दृढ झाली आहे.

  First published:

  Tags: Cricket, Gautam gambhir, India, Rohit sharma, Team india, Test cricket, Virat kohli