मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /'गेले काही दिवस जादुई...' बुमराह-संजनाची लग्नानंतरची प्रतिक्रिया, PHOTOS होतायंत व्हायरल

'गेले काही दिवस जादुई...' बुमराह-संजनाची लग्नानंतरची प्रतिक्रिया, PHOTOS होतायंत व्हायरल

टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहचं (Jasprit Bumrah) स्पोर्ट्स एँकर संजना गणेशनसोबत (Sanjana Ganesan) लग्न झालं. 15 मार्चला गोव्यामध्ये हे दोघंही विवाहबंधनात अडकले.

टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहचं (Jasprit Bumrah) स्पोर्ट्स एँकर संजना गणेशनसोबत (Sanjana Ganesan) लग्न झालं. 15 मार्चला गोव्यामध्ये हे दोघंही विवाहबंधनात अडकले.

टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहचं (Jasprit Bumrah) स्पोर्ट्स एँकर संजना गणेशनसोबत (Sanjana Ganesan) लग्न झालं. 15 मार्चला गोव्यामध्ये हे दोघंही विवाहबंधनात अडकले.

मुंबई, 19 मार्च : टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहचं (Jasprit Bumrah) स्पोर्ट्स एँकर संजना गणेशनसोबत (Sanjana Ganeshan) लग्न झालं. 15 मार्चला गोव्यामध्ये हे दोघंही विवाहबंधनात अडकले.  या नव्या जोडप्यावर सध्या जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.  या सर्व शुभेच्छांचा बुमराह आणि संजनां स्वीकार केला असून सर्वांचे आभार मानले आहेत.

'गेले काही दिवस हे जादुई होते. तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा आणि प्रेमामुळे आम्ही भारावून गेलो आहेत, धन्यवाद' अशी प्रतिक्रिया बुमराहनं दिली आहे.

बुमराह पाठोपाठ संजना गणेशननं देखील ट्विट करुन सर्वांचे आभार मानले आहेत. 'गेल्या काही दिवसांपासून तुम्ही आमच्यावर जो प्रेमाचा वर्षाव केला आहे, तो अभुतपूर्व आहे. आम्ही तुमच्या सर्वाचे मेसेज आणि शुभेच्छा आम्ही वाचत असून त्या खूप आनंद देणाऱ्या आहेत. धन्यवाद,' या शब्दात संजनानं सर्वांचे आभार मानले आहेत.

Overwhelmed by all the love we’ve been showered with over the last few days. We’ve been reading all your messages & wishes with the biggest smiles on our faces! Thank you. pic.twitter.com/13ykcffi9Z

— Sanjana Ganesan (@SanjanaGanesan) March 19, 2021

संजना गणेशन आयसीसी 2019 वर्ल्ड कपमध्ये एँकर होती. इंजिनियर असलेल्या संजनाने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मॉडेलिंगला सुरूवात केली. 2014 साली ती मिस इंडियापर्यंत पोहोचली. संजनाने एमटीव्हीवरचा रियलिटी शो स्पिल्टस व्हिलामधून टीव्हीमध्ये पदार्पण केलं. 2013 साली तिने फेमिना गॉर्जियस किताबही पटकावला आहे.

संजना आयपीएलमध्ये केकेआर डायरीज नावाचा शोदेखील करत होती. 2016 साली ती कोलकात्याच्या टीमशी जोडली गेली, यानंतर तीनं 'नाईट क्लब' स्पेशल शो देखील केला.

(हे वाचा- बुमराह अडकला संजनाबरोबरच्या बेडीत! पहिल्यांदाच समोर आले लग्नाचे सुंदर फोटो )

यापूर्वी बुमराह आणि संजनाने इन्स्टाग्रामवर लग्नाचा फोटो शेयर केला. 'प्रेमाने प्रेरित होऊन आम्ही दोघांनी नव्या प्रवासाला सुरूवात केली आहे. आज आमच्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. आमच्या लग्नाची बातमी तुम्हाला सांगताना आम्हाला मनापासून आनंद होत आहे,' असं त्यांनी या फोटोसोबत लिहिलं.

First published:

Tags: Goa, Jasprit bumrah, Marriage, Photoshoot, Pictures viral, Social media viral, Twitter, Wedding