मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /अर्जेंटिनाच्या विजयानंतर केरळमध्ये सेलिब्रेशनला गालबोट, एका चाहत्याचा मृत्यू

अर्जेंटिनाच्या विजयानंतर केरळमध्ये सेलिब्रेशनला गालबोट, एका चाहत्याचा मृत्यू

अर्जेंटिनाचे चाहते विजयाचा जल्लोष करत असताना केरळमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय इतर काही घटनांमध्ये  तिघेजण जखमी झाले होते तर एकजण गंभीर जखमी होता अशी माहिती पोलिसांनी दिली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 19 डिसेंबर : अर्जेंटिनाने फ्रान्सला हरवून फिफा वर्ल्ड कप जिंकला. यानंतर अर्जेंटिनाचे चाहते विजयाचा जल्लोष करत असताना केरळमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय इतर काही घटनांमध्ये  तिघेजण जखमी झाले होते तर एकजण गंभीर जखमी होता अशी माहिती पोलिसांनी दिली. काही ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवणाऱ्या पोलिसांवर चाहत्यांनी हल्ला केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोल्लममध्ये अर्जेंटिनाच्या विजयनानंतर चाहत्यांनी मिरवणूक काढली होती. अंतिम सामन्याचे स्क्रीनिंग जिथे सुरू होते तिथे कोसळल्याने अक्षय कुमार नावाच्या १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

हेही वाचा : एक क्रिकेटचा देव अन् दुसरा फुटबॉलचा; सचिन मेस्सीचा वर्ल्ड कपचा सेम टू सेम प्रवास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पल्लियामूलामध्ये अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळवल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तेव्हा अर्जेंटिनाच्या चाहत्यांनी फ्रान्सच्या चाहत्यांना डिवचले. तेव्हा दोन्ही बाजूच्या चाहत्यांची बाचाबाची झाली. या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं असून लवकरच अटक केली जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे.

अर्जेंटिनाच्या विजयानंतर कोची आणि थिरुवनंतपुरममध्ये दोन पोलिसांवर सेलिब्रेशन करणाऱ्या चाहत्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी गर्दी हटवत असताना पोलिस अधिकाऱ्याला रस्त्यावर खेचण्यात आल्याचा प्रकार घडल्याचं पोलिसांनी म्हटलं. थिरुवनंतपूरममध्ये ज्या ठिकाणी अंतिम सामना पाहण्यासाठी स्क्रीन लावण्यात आली होती तिथे पोलिस उपनिरीक्षकावर हल्ला करण्यात आला. घटनास्थळी गोंधळ घालणाऱ्या दोन तरुणांना तिथून बाजूला करत असताना पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला केला गेला.

First published:

Tags: FIFA, FIFA World Cup, Kerala