मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /मिल्खा सिंग यांची तब्येत स्थिर, पत्नी निर्मलबाबत हॉस्पिटलनं दिलं अपडेट

मिल्खा सिंग यांची तब्येत स्थिर, पत्नी निर्मलबाबत हॉस्पिटलनं दिलं अपडेट

दिग्गज धावपटू मिल्खा सिंग (Milkha Singh) यांना कोरोना व्हायरसची (coronavirus) लागण झाल्याने त्यांच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

दिग्गज धावपटू मिल्खा सिंग (Milkha Singh) यांना कोरोना व्हायरसची (coronavirus) लागण झाल्याने त्यांच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

दिग्गज धावपटू मिल्खा सिंग (Milkha Singh) यांना कोरोना व्हायरसची (coronavirus) लागण झाल्याने त्यांच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

चंदीगड, 30 मे:  दिग्गज धावपटू मिल्खा सिंग (Milkha Singh) यांना कोरोना व्हायरसची (coronavirus) लागण झाल्याने त्यांच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची तब्येत आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्याचबरोबर मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल कौर (Nirmal Kaur) यांना आवश्यक असलेल्या ऑक्सिजनमध्ये थोडी वाढ झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. निर्मल या भारतीय महिला व्हॉलीबॉल टीमच्या माजी कॅप्टन आहेत.

मिल्खा सिंग आणि निर्मल यांच्यावर मोहालीच्या फोर्टीज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांच्या तब्येतीचे अपडेट सांगण्यासाठी हॉस्पिटलने प्रसिद्धपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. यापूर्वी या दोघांना कोव्हिड 19- न्यूमोनिया झाल्याचे हॉस्पिटले सांगितले होते.

मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर सोमवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांनाही कोरनोची लागण झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांचा मुलगा आणि प्रसिद्ध गोल्फर जीवा मिल्खा सिंग दुबईहून चंदीगडमध्ये आला आहे. तसेच अमेरिकेत डॉक्टर असलेली त्यांची मुलगी मोना या देखील काही दिवसांपूर्वी चंदीगडमध्ये आल्या आहेत. सध्या मिल्खा सिंग आणि त्यांच्या पत्नीला एका रुममध्ये ठेवल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासाने दिली आहे.

'Vamika चा चेहरा कधी दाखवणार?,' फॅन्सच्या प्रश्नाला विराटने दिले उत्तर

मिल्खा सिंग यांची भारताचे महान धावपटू म्हणून ओळख आहे. त्यांनी आशियाई स्पर्धेत चार सुवर्ण पदक (Gold Medal) जिंकले होते. तसेच राष्ट्रकूल स्पर्धेतही विजेतेपद पटकावले. रोममध्ये 1960 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी सर्वोत्तम कमगिरी केली. मात्र त्यांचे कांस्यपदक (Bronze Medal) अगदी थोड्या फरकाने हुकले होते.

First published:

Tags: Chandigarh, Coronavirus