मुंबई, 30 जानेवारी : इंटनेटच्या युगात अनेक गोष्टी झटकन व्हायरल (Viral) होतात. अनेक गोष्टींची माहिती मोबाईलमधील इंटरनेटवर अगदी एका क्लिकवर उपलब्ध आहे. माहिती देणारी माध्यमं वाढली आहेत. याचा जसा फायदा आहे, तसंच याचा गैरफायदा घेणारी देखील काही मंडळी आहेत. या बातम्या इंटरनेटवर अगदी वेगानं पसरतात.
मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians ) प्रमुख सदस्य आणि वेस्ट इंडिजचा (West Indies) वन-डे आणि टी 20 टीमचा कॅप्टन कायरन पोलार्ड ( Kieron Pollard) बद्दलही एक बातमी सर्वत्र व्हायरल झाली होती. त्या बातमीनं अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता.
काय होती बातमी?
कायरन पोलार्डच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची चर्चा शुक्रवारी दिवसभर सोशल मीडियावर (Social Media) रंगली होती. या अपघाताचे काही कथित व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. या अपघातामध्ये पोलार्डचा मृत्यू झाल्याचा दावाही करण्यात येत होता त्यामुळे काही फॅन्सनी या बातमीची पडताळणी न करता पोलार्डला चक्क श्रद्धांजली देखील वाहिली.
काय आहे सत्य?
या सर्व अफवा ज्याच्याबद्दल पसरवल्या जात आहेत, तो पोलार्ड सध्या आबुधाबीमधील T10 लीगमध्ये (T10 League 2021) खेळत आहे. तो या स्पर्धेतील डेक्कन ग्लॅडिएटर्स (Deccan Gladiators) या टीमचा कॅप्टन आहे. पुणे डेव्हिल्स (Pune Devils) विरुद्ध झालेल्या पहिल्या मॅचमध्ये पोलार्ड अपयशी ठरला. तो फक्त 2 रन काढून आऊट झाला. पुणे डेव्हिल्सनं ही मॅच सात विकेट्सनं जिंकली.
या स्पर्धेपूर्वी कोरोना व्हायरसचं कारण देऊन बांगालदेश दौऱ्यातून माघार घेणाऱ्या प्रमुख खेळाडूंमध्ये पोलार्डचा सहभाग होता. या स्पर्धेतील वन-डे मालिकेत वेस्ट इंडिजचा 0-3 असा पराभव झाला. आता दोन्ही टीम टेस्ट सीरिजची तयारी करत आहेत.
त्यामुळे ज्याच्याबद्दल या सर्व अफवा पसरवल्या जात आहेत, तो कायरन पोलार्ड हा आबुधाबीमध्ये सुरक्षित आहे. त्याच्या मृत्यूची व्हायरल झालेली बातमी खोटी असल्याचं पडताळणीमध्ये स्पष्ट झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Viral news