सिडनी, 29 जानेवारी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (Australia vs New Zealand) यांच्यात 27 फेब्रुवारीपासून 5 T20 मॅचची सीरिज सुरू होणार आहे. या सीरिजसाठी एका 19 वर्षाच्या भारतीय बॉलरची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड झाली आहे. तनवीर संघा (Tanveer Sangha) असं या बॉलरचं नाव असून, तो सध्या बिग बॅश लीगमध्ये (BBL) सिडनी थंडरकडून (Sydney Thunder) खेळत आहे. टॅक्सी ड्रायव्हरचा मुलगा तनवीरचे वडील जोगा संघा हे सिडनीमध्ये टॅक्सी ड्रायव्हर (Taxi Driver) आहेत. पंजाबमधील जालंधरजवळ त्याचं गाव आहे. त्यांनी 1997 साली ऑस्ट्रेलियात स्थालांतर केलं. “मी भारतामध्ये असताना कधीही क्रिकेट पाहिलं नव्हतं. भारतामध्ये मी कबड्डी, व्हॉलीबॉल आणि कुस्ती हे खेळ खेळत होतो. इथंही हिवाळ्यात होणाऱ्या कुस्ती स्पर्धा मी पाहतो. तनवीर देखील माझ्याबरोबर या स्पर्धा पाहण्यासाठी येत असे. तसंच तो ज्युनिअर गटातील कुस्ती स्पर्धेत खेळला देखील आहे,’’ अशी माहिती जोगा यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना दिली.
(वाचा - T10 League: फक्त 14 बॉलमध्ये झळकावलं वादळी अर्धशतक! )
“तनवीर 10 वर्षांचा असताना क्रिकेट खेळू लागला. त्याला क्लबमध्ये नेण्यासाठी आणि घरी परत आणण्यासाठी मला अनेक टॅक्सी भाडी नाकारावी लागत. त्याची भरपाई मी रात्री टॅक्सी चालवून करत असे,’’ असं जोगा यांनी सांगितलं का झाली तनवीरची निवड? तनवीरनं फास्ट बॉलर म्हणून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर तो लेगस्पिनर बनला. सिडनीमधील क्लब क्रिकेटमध्ये त्याच्या बॉलिंगनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यामुळे त्याची अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड झाली होती. त्या स्पर्धेत त्यानं 6 मॅचमध्ये 15 विकेट्स घेतल्या होत्या.
(वाचा - मैदानातली ‘ही’ एक चूक, लगेच चढतो रवी शास्त्रींचा पारा! )
ऑस्ट्रेलियामध्ये सध्या सुरु असलेल्या बिग बॅश स्पर्धेतही तनवीरनं भेदक बॉलिंग केली आहे. सिडनी थंडरकडून खेळताना त्यानं आत्तापर्यंत 21 विकेट्स घेतल्या आहेत.
Congratulations to Daniel Sams and Tanveer Sangha who have been named in the Aussie squad for the upcoming T20 tour of New Zealand! ⭐️#ThunderNation pic.twitter.com/OJPNmtdvwh
— Sydney Thunder (@ThunderBBL) January 27, 2021
तनवीर हा ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड झालेला दुसरा भारतीय वंशाचा खेळाडू आहे. यापूर्वी 2015 साली गुरेंद्र संधू याची ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये निवड झाली होती.

)







