Home /News /sport /

Euro Cup 2020 Final: इंग्लंडच्या फुटबॉल कोचचा 'धोनी' होण्याचा प्रयत्न फसला

Euro Cup 2020 Final: इंग्लंडच्या फुटबॉल कोचचा 'धोनी' होण्याचा प्रयत्न फसला

शेवटपर्यंत रंगलेल्या या फायनलमध्ये इटलीनं इंग्लंडचा पेनल्टी शूटआउटमध्ये पराभव (Italy Win on Penalties) केला. इंग्लंडच्या फुटबॉल टीमचे कोच साऊथगेटचा (Southgate) महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) होण्याचा प्रयत्न टीमच्या अंगलट आला.

    लंडन, 12 जुलै : युरो कपच्या इतिहासात पहिल्यांदाच फायनलमध्ये (UEFA EURO 2020 Final) प्रवेश केलेली इंग्लंडची टीम विजेतेपद पटकावणार म्हणून लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर गर्दी केलेल्या  इंग्लिश फॅन्सची निराशा झाली. शेवटपर्यंत रंगलेल्या या फायनलमध्ये इटलीनं इंग्लंडचा पेनल्टी शूटआउटमध्ये पराभव (Italy Win on Penalties) केला. इंग्लंडच्या फुटबॉल टीमचे कोच साऊथगेटचा (Southgate) महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) होण्याचा प्रयत्न टीमच्या अंगलट आला. नेमके काय घडले? इंग्लंड विरुद्ध इटली (England vs Italy) ही फायनल मॅच निर्धारित वेळ आणि अतिरिक्त वेळेत देखील 1-1 अशा बरोबरीत होती. त्यामुळे पेनल्टी शूट आऊटमध्ये हा सामना गेला. या सामन्यातील पाचवी आणि निर्णाय पेनल्टी 19 वर्षाच्या बुकायो साका (Bukayo Saka) याला देण्याचा निर्णय साऊथगेटनं घेतला. युरो फायनलसारख्या मोठ्या सामन्यात शेवटची पेनल्टी घेणे हे अनुभवी खेळाडूंचे काम होते. साऊथगेटसमोर अनुभवी खेळाडूंचे पर्याय होते, पण त्याने आजवर प्रोफेशनल सामन्यात पेनल्टीचा अनुभव नसलेल्या साकाला सर्वात महत्त्वाची संधी दिली साकाला ते दडपण सहन झाले नाही. धोनीनं काय केलं होतं? टीम इंडियाचाच नाही तर क्रिकेट विश्वातील कल्पक कॅप्टन म्हणून महेंद्रसिंह धोनी  ओळखला जातो. साऊथगेटचा हा प्रयत्न फसल्यावर अनेक क्रिकेट फॅन्सला धोनीनं 2007 च्या T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये घेतलेल्या निर्णयाची आठवण झाली. धोनीनं पाकिस्तान विरुद्ध झालेल्या फायनलमध्ये सेट झालेल्या मिसबाह उल हकसमोर जोगिंदर शर्माच्या (Joginder Sharma) हातामध्ये फायनल ओव्हर दिली होती. धोनीच्या या निर्णयाबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र जोगिंदरनं त्याचं काम चोख केलं. मिसबाह उल हकला आऊट करत भारताला विजेतेपद मिळवून दिले. Euro Cup 2020 Final: न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूनं लगावला ICC ला टोला, Tweet करत विचारला बोचरा सवाल साऊथ गेटच्या मनातही कदाचित धोनीसाराखाच विचार असावा. त्याला भारत-पाकिस्तानची फायनलपाहूनही तो विचार सुचला असावा. त्यामुळे त्याने इंग्लंडच्या फुटबॉल टीमचा धोनी होण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: England, Euro 2021, Football, MS Dhoni

    पुढील बातम्या