मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

शोएब अख्तरने पाकिस्तानच्या संघावर काढला राग, इंग्लंडचे केले कौतुक

शोएब अख्तरने पाकिस्तानच्या संघावर काढला राग, इंग्लंडचे केले कौतुक

पाकिस्तानच्या पराभवावर प्रतिक्रिया देताना शोएब अख्तरने इंग्लंडच्या संघावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर पाकिस्तानच्या खेळाडुंवर सडकून टीका केली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Yadav

मुंबई, 06 डिसेंबर : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पराभवानंतर पाकिस्तानच्या संघावर माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने राग काढला आहे. त्याने पाकिस्तानच्या पराभवावर प्रतिक्रिया देताना इंग्लंडच्या संघावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर पाकिस्तानच्या खेळाडुंवर सडकून टीका केली.

टी२० वर्ल्ड कपवेळी शोएब अख्तरने त्याच्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ टाकला होता. त्यावेळी त्याने भारतीय संघ सेमीफायनलमधून बाहेर पडेल असं म्हटलं होतं. त्यावेळी अख्तरला भारतीय चाहत्यांनी बरंच सुनावलं होतं. तर शमीनेसुद्धा फायनलमध्ये पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तरला ट्रोल केलं होतं.

हेही वाचा : महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी ऋषिकेश कानिटकर, तर रमेश पोवार NCAत जाणार

इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानचा संघ पराभूत झाल्यानतंर शोएब अख्तरने म्हटलं की, इंग्लडने पाकिस्तानला जिंकण्याची संधी दिली होती. पण पाकिस्तानच्या संघाने जिंकण्याची जिद्द दाखवली नाही आणि तशी त्यांची इच्छाही दिसली नाही. अत्यंत वाईट असं क्रिकेट पाकिस्तानचा संघ खेळल्याची टीका शोएब अख्तरने केली.

खेळपट्टी खूपच खराब होती. फलंदाजीला पोषक वातावरण असतानाही कोणत्याच पाकिस्तानी फलंदाजाने धोका पत्करला नाही. पाकिस्तानने जिंकण्यासाठी खेळ केलाच नाही. त्यांनी अनिर्णित कसोटी ठेवता यावी यासाठी अशी खेळपट्टी तयार केल्याचा आरोपही अख्तरने केला.

हेही वाचा : वर्ल्ड चॅम्पियन ते त्रिशतकवीर! टीम इंडियाचा 5 खेळाडूंचा आज वाढदिवस

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात धावांचा पाऊस पडला. इंग्लंडने पहिल्या डावात धावांचा डोंगर उभा केला होता. त्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र अखेरच्या सत्रात इंग्लंडच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत पाकिस्तानचा डाव गुंडाळला आणि विजय मिळवला.

First published:

Tags: Cricket, England, Pakistan