चेन्नई, 18 फेब्रुवारी : आयपीएल 2021 (IPL 2021) स्पर्धेच्या मिनी ऑक्शनमध्येही ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) साठी जोरदार चुरस रंगली होती. मागच्या वर्षी मॅक्सवेलला 10 कोटींमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबनं खरेदी केलं होतं. मागच्या सिझनमध्ये सुपर फ्लॉप ठरुनही यंदा त्याला त्यापेक्षा जास्त भाव मिळाला आहे.
महेंद्र सिंह धोनीची (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स आणि विराट कोहलीची (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात मॅक्सवेलला खरेदीसाठी जोरदार चुरस रंगली होती. दोन्ही टीम मॅक्सवेलला खरेदी करण्यासाठी हट्टाला पेटल्या होत्या. त्यांनी मॅक्सवेलसाठी सातत्यानं बोली लावली.
चेन्नई सुपर किंग्सकडे एकूण 19 कोटी 90 लाख रुपये शिल्लक आहेत. त्यांनी मॅक्सवेलसाठी तब्बल 14 कोटींची बोली लावली. चेन्नईकडे एकच विदेशी खेळाडूची जागेसाठी त्यांनी मॅक्सवेला खरेदी करण्यासाठी जोरदार प्रयत्न केला. मात्र या लढाईत अखेर RCB नं बाजी मारली. आरसीबीनं 14 कोटी 25 लाख रुपयांमध्ये मॅक्सवेलला खरेदी केलं.
मॅक्सवेलची इच्छा पूर्ण!
विशेष म्हणजे मॅक्सवेलनं काही दिवसांपूर्वीच RCB कडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. ईएसपीएन क्रिकइन्फो’शी बोलताना मॅक्सवेलनं त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून (RCB) खेळण्याची इच्छा असल्याचं सांगितलं. आरसीबीचा एबी डिव्हीलियर्स (AB de Villiers) हा मॅक्सवेलचा आदर्श आहे. “एबी माझ्यासाठी एक आदर्श आहे. त्याचा खेळ पाहयला नेहमी आवडतो. अशा प्रकारच्या खेळाडूसोबत खेळणं हा एक चांगला अनुभव असेल. त्याचा मला फायदा देखील होईल. त्याच्याशी चर्चा केल्यानंतर मला नेहमीच छान वाटतं.’’ असं मॅक्सवेलनं सांगितलं होतं.
आरसीबीनं यंदा ख्रिस मॉरीस, शिवम दुबे आणि मोईन अली या ऑल राऊंडर्सना रिलीज केलं आहे. त्यांच्या टीममधील ऑल राऊंडरची जागा मॅक्सवेल भरु शकतो. तो पहिल्या क्रमांकापासून सातव्या क्रमांकावर कुठेही खेळण्यास सक्षम आहे. तसंच त्याची स्पिन बॉलिंग देखील टीमसाठी उपयुक्त आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, Ipl 2021 auction