रावळपिंडी, 01 नोव्हेंबर: इंग्लंडच्या संघाने पाकिस्तानच्या गोलंदाजांना त्यांच्याच घरच्या मैदानात सळो की पळो करून सोडलं आहे. 17 वर्षानंतर इंग्लंडचा संघ पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळण्यासाठी गेला आहे. नाणेफेक जिंकल्यानतंर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानतंर बेन डकेट आणि जॅक क्रॉल यांनी यजमानांना दिवसा तारे दाखवले. दोघांनी पहिल्याच षटकापासून पाकिस्तानच्या गोलंदाजीला दणके द्यायला सुरुवात केली होती.
इंग्लंडच्या सलामीवीरांनी अशी काही फलंदाजी केली की कसोटी क्रिकेट नव्हे तर टी20 सामना सुरू आहे का अशी शंका आली. बेन डकेट आणि जॅक क्रॉले यांनी लंच ब्रेकआधी 174 धावा केल्या होत्या. यासह दोघांच्या नावावर विश्वविक्रमाची नोंद झाली. इंग्लंडने भारताचा विश्वविक्रम मोडताना कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्याच सत्रात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नावावर केला.
हेही वाचा : पाकिस्तानची नाचक्की, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच गोलंदाजांची अशी धुलाई
2018 मध्ये भारताने अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या सत्रात एकही गडी न गमावता 158 धावा केल्या होत्या. तो विश्वविक्रम मोडताना इंग्लंडने आता नवा विक्रम नोंदवला. बेन डकेट आणि क्रॉले यांनी तुफान फटकेबाजी केली. बेन स्टोक्स इंग्लंडचा कर्णधार आणि ब्रेडन मॅक्युलम प्रमुख प्रशिक्षक बनला आहे तेव्हापासून इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटचा खेळ बदलला आहे.
हेही वाचा : BCCI च्या क्रिकेट सल्लागार समितीत भारताच्या 'या' माजी क्रिकेटपटूंची वर्णी
इंग्लंडकडून क्रॉलेने 122 तर डकेटने 107 धावांची खेळी केली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 233 धावा केल्या. इंग्लडने पहिल्या दिवशी 75 षटकात 500 धावांचा आकडा ओलांडला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने चार बाद 504 धावा केल्या. अंधुक प्रकाशामुळे पहिल्या दिवशीचा खेळ वेळेआधी थांबवण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ben stokes, Cricket, England, Pakistan