रांची, 2 डिसेंबर: आयपीएल 2021 चॅम्पियन टीम चेन्नई सुपर किंग्जचा (IPL2021 WIN CSK) आणि टीम इंडियाचा माजी यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनी(MS Dhoni )नेहमीच चर्चेत असतो. त्याची प्रत्येक गोष्ट चाहत्यांना वेड लावत असते. नुकतंच आगामी आयपीएल 2022 (IPL2022)साठी रिटेन केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महेंद्र सिंह धोनीदेखील आहे. दरम्यना चेन्नईचा सुपर किंग्ज संघाचा थलाइवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माहीचे एक कार्टून सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. चेन्नई सुपर किंग्जने 2022 च्या आयपीएलसाठी सर्व नियोजन केले आहे आणि पाचव्यांदा विजेतेपद मिळविण्यासाठी मेगा लिलावापूर्वी आपल्या चार प्रमुख खेळाडूंना कायम ठेवले आहे. यामध्ये धोनीच्या नावाचाही समावेश आहे. व्हिसल पॉडू क्लब आणि सीएसके फॅन्स क्लबने प्रसिद्ध केलेल्या या व्यंगचित्रात तेच खेळाडू दिसत आहेत. ज्यांना संघाने रिटेन केले आहे. व्हायरल होणाऱ्या या चित्रामध्ये चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी पिवळ्या लुंगीमध्ये खंटी थलैवाच्या लूकमध्ये खुर्चीवर बसलेला दाखवण्यात आला आहे. त्याच वेळी, टीमचे दोन्ही फिरकीपटू मोईन अली आणि रवींद्र जडेजा हे धोनीच्या अगदी मागे उभे आहेत. चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडही दिसत आहे. आयपीएल 2022 ची चॅम्पियन टीम चेन्नई सुपर किंग्जच्या या चार सुपरस्टार्सने सजवलेले हे कार्टून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे आणि त्याला भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. चेन्नई सुपर जीन्सच्या व्यवस्थापनाने प्रथम रवींद्र जडेजाला 16 कोटींची सर्वात मोठी रक्कम देऊल संघात कायम ठेवेले आहे. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीला 12 कोटींसाठी कायम ठेवण्यात आले. खरे तर चेन्नईच्या संघाच्या यशात अष्टपैलू खेळाडूंचा वाटा सर्वाधिक दिसून आला आहे. ज्याचा थेट फायदा रवींद्र जडेजा तसेच मोईन अलीला झाला. आयपीएल 2021 चे विजेतेपद जिंकल्यानंतर माही आयपीएलमधूनही निवृत्ती घेईल या चर्चेने क्रिकेट जगतात जोर धरला होता. या चर्चेनंतर धोनीने, ‘चेन्नईच्या मैदानावर खेळताना आयपीएलमधून निवृत्ती घ्यायची आहे.’’ असे स्पष्ट करत चर्चेला पुर्णविराम दिला. यानंतर अखेर धोनीला चेन्नई सुपर किंग्ज व्यवस्थापनाने कायम ठेवल्याची बातमी समोर आली आहे. आता पुढील आयपीएलमध्ये धोनी पुन्हा चेन्नईचे नेतृत्व करताना दिसणार आहे. पण, चार खेळाडू वगळता उर्वरित खेळाडू नवीन असतील. धोनीला खेळाडूंशी ताळमेळ कसा साधायचा हे चांगले माहीत असले तरी कोणत्या खेळाडूला कोणती जबाबदारी द्यायची यावरही तो लक्ष ठेवतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.