या पार्टीला चेन्नई संघाचे खेळाडूंसह जवळपास सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच सर्वजण पारंपारिक पोषाखात दिसत आहेत. सर्वांनी प्लेन टी शर्ट आणि साऊथची लुंगी परिधान केली होती. तसेच खेळाडू कॉनवेबरोबर डान्स करताना दिसून येत आहे. या पार्टीसाठी कॉनवेटी गर्लफ्रेंड व्हिडिओ कॉलद्वारे सर्वांशी जोडली गेली होती. कॉनवेने या पार्टीसाठी चेन्नई सुपर किंग्सचे (CSK) आभारही मानले. याबरोबरच खेळाडू आणि चेन्नईचे अन्य सदस्य यावेळी कॉनवेला शुभेच्छा देताना आणि त्याला लिफाफे देतानाही दिसले. यात चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार एमएस धोनीचाही समावेश होता. कॉवनेच्या प्री वेडींग पार्टीच्या व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत.More More pic.twitter.com/HzCagxbbZw
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 19, 2022
चेन्नईने कॉनवेला आयपीएल 2022 साठी लिलावात 1 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. त्याने चेन्नईकडून पहिला सामना खेळला होता. त्यानंतर त्याला अंतिम ११ जणांमध्ये संधी मिळालेली नाही. आयपीएल 2022 मध्ये सीएसकेने आत्तापर्यंत 6 सामने खेळले असून 5 सामने पराभूत झाले असून एकच सामना जिंकण्यात त्यांना यश मिळाले आहे.Now showing - Kim & Conway Wedding Cassette ! https://t.co/oYBPQHs25f!#WeddingWhistles #Yellove pic.twitter.com/pTLdQgTa5n
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 19, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Csk, Ipl 2022, MS Dhoni, Pre wedding photo shoot