मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Virat Kohli च्या चिमुकलीवर रेपच्या धमकीची दिल्ली महिला आयोगाने घेतली गंभीर दखल

Virat Kohli च्या चिमुकलीवर रेपच्या धमकीची दिल्ली महिला आयोगाने घेतली गंभीर दखल

swati maliwal

swati maliwal

विराट कोहलीची चिमुकली वामिकाला (vamika kohli) बलात्काराच्या धमक्या दिल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या गोष्टीची गंभीर दखल दिल्ली महिला आयोगाची मुख्य स्वाती मालीवाल यांनी घेतली आहे.

नवी दिल्ली, 1नोव्हेंबर: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची अवघ्या 10 वर्षाची चिमुकली वामिकाला बलात्काराच्या धमक्या (Rape Threat to Virat Kohli's 10-Month-Old Daughter) दिल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर दिल्ली महिला आयोगाने या गोष्टीची गंभीर दखल घेत पोलिसांना यासंदर्भास नोटीस पाठवली असल्याचे समोर आले आहे.

सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. त्यामध्ये वामिकाला बलात्काराच्या धमक्या दिल्या असल्याचे दिसत आहे. या गोष्टीची गंभीर दखल घेत दिल्ली महिला आयोगाची मुख्य स्वाती मालीवाल यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांना पत्र लिहून आरोपींवर कारवाई करण्याची विनंती केली आहे.

Virat Kohli च्या चिमुकलीवर बलात्काराच्या धमक्या? नेटीझन्सह पाकचा खेळाडूही संतापला

 या संदर्भात नोंदवलेल्या एफआयआरबाबत दिल्ली पोलिसांकडून माहिती मागवण्यात आली आहे. आयोगाला हे जाणून घ्यायचे आहे की, या प्रकरणात कोणते आरोपी ओळखले गेले आणि त्यांना अटक करण्यात आली. मालिवाल यांनी म्हटले आहे की, जर अटक झाली नसेल, तर दिल्ली पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासाठी काय पावले उचलली आहेत याची माहिती द्यावी. यासंदर्भात आयोगाने दिल्ली पोलिसांकडून 8 नोव्हेंबरपर्यंत तपशीलवार अहवाल मागवला आहे.

स्वाती मालीवाल यांनी पत्रात म्हटले आहे की, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर विराट कोहलीच्या 10 महिन्यांच्या मुलीला सोशल मीडियावर बलात्काराच्या धमक्या येत आहेत. स्वातीच्या म्हणण्यानुसार, विराटवर देखील हल्ला केला जात आहे. कारण, पाकिस्तानच्या पराभवानंतर टीकेचा धनी ठरलेल्या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला पाठिंबा दिला होता.

नेमकं काय आहे प्रकरण?

सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. त्यामध्ये वामिकाला बलात्काराच्या धमक्या दिल्या असल्याचे दिसत आहे. इतकेच नव्हेतर विराट आणि अनुष्काबद्दही चुकीचे भाष्य केले आहे. याच व्हायरल होणाऱ्या स्क्रीनशॉट नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी विराट कोहीलीसह त्याच्या कुटुंबाला पाठिंबा दर्शवला आहे.

Image

या स्क्रीनशॉट संबंध थेट मोहम्मद शमीशी करण्यात येत आहे. विराटने शमीला पाठिंबा दिल्यामुळे त्याच्या मुलीला अशा प्रकारच्या धमक्या येत असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण एका युजरने कमेंट करत '10 महिन्यांच्या मुलीला धमकावत आहेत, कारण तिच्या वडिलांनी त्याचा मुस्लिम जोडीदार शमीसाठी भूमिका घेतली! हा समाज सडलेला नाही तर दुसरं काय बोलणार?' असे म्हटले आहे.

टीम इंडियाच्या पाकिस्तानविरुद्ध (IND vs PAK) पराभवानंतर मोहम्मद शमीवर (Mohammad Shami) धार्मिक रंग देत त्याला टीकेला धनी ठरवले. त्यानंतर त्याच्या समर्थनात अनेकजण उभे राहिले. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनेदेखील (Virat Kohli) शमीला पाठिंबा दिला.

First published:

Tags: Anushka sharma, Delhi Police, T20 cricket, T20 world cup, Virat kohli