मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Virat Kohli च्या चिमुकलीवर बलात्काराच्या धमक्या? नेटीझन्सह पाकचा खेळाडूही संतापला

Virat Kohli च्या चिमुकलीवर बलात्काराच्या धमक्या? नेटीझन्सह पाकचा खेळाडूही संतापला

Vamika Kohli

Vamika Kohli

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची (virat kohli's daughter vamika gets rape threat) चिमुकली वामिकाला बलात्काराच्या धमक्या दिल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली, 1नोव्हेंबर: क्रिकेट जगतात लज्जास्पद घटना घडली असल्याचे समोर आले आहे. टीम इंडियाच्या पाकिस्तानविरुद्ध (IND vs PAK) पराभवानंतर मोहम्मद शमीवर (Mohammad Shami) धार्मिक रंग देत त्याला टीकेला धनी ठरवले. त्यानंतर त्याच्या समर्थनात अनेकजण उभे राहिले. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनेदेखील (Virat Kohli) शमीला पाठिंबा दिला. मात्र, काही माथेफिरुंनी विराटला लक्ष्य करत अवघ्या 10 वर्षाची चिमुकली वामिकाला बलात्काराच्या धमक्या (Rape Threat to Virat Kohli's 10-Month-Old Daughter) दिल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. त्यामध्ये वामिकाला बलात्काराच्या धमक्या दिल्या असल्याचे दिसत आहे. इतकेच नव्हेतर विराट आणि अनुष्काबद्दही चुकीचे भाष्य केले आहे. याच व्हायरल होणाऱ्या स्क्रीनशॉट नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी विराट कोहीलीसह त्याच्या कुटुंबाला पाठिंबा दर्शवला आहे.

पाकचा माजी कर्णधार इंझमाम उल हकनेही या गोष्टीचा निषेध व्यक्त करत कोणालाही खेळाडूच्या कुटुंबावर कोणतीच प्रतिक्रिया देण्याचा हक्क नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर अनेक नेटीझन्सनी संताप व्यक्त केला असून एका महिला पत्रकाराने ही गोष्ट वाचून अगदी उल्टी करावीशी वाटत आहे असं ट्विट केलं आहे.

तर काही नेटीझन्सनी आम्ही सर्व विराट आणि त्याच्या कुटुंबासोबत असून ते सुरक्षित राहतील अशाही आशयाचे ट्विट केले आहेत.

या स्क्रीनशॉट संबंध थेट मोहम्मद शमीशी करण्यात येत आहे. विराटने शमीला पाठिंबा दिल्यामुळे त्याच्या मुलीला अशा प्रकारच्या धमक्या येत असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण एका युजरने कमेंट करत '10 महिन्यांच्या मुलीला धमकावत आहेत, कारण तिच्या वडिलांनी त्याचा मुस्लिम जोडीदार शमीसाठी भूमिका घेतली! हा समाज सडलेला नाही तर दुसरं काय बोलणार?' असे म्हटले आहे.

टी-20 टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानकडून 10 गडी राखून पराभव झाला. टी20 विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानने पहिल्यांदाच भारताचा पराभव केला होता. ज्यामुळे चाहत्यांचा राग सोशल मीडियाद्वारे खेळाडूंवर उफाळून आला. दरम्यान पाकिस्तानच्या हातून झालेल्या पराभवानंतर भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीवा पराभवाच खापर फोडत त्याला धर्मावरुल ट्रोल केले.

कारण शमीने 3.5 षटकात 43 धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर पाकिस्तानच्या सलामीवीरांनी 6 चौकार, एक षटकार ठोकला. या खराब कामगिरीनंतर लोकांनी मोहम्मद शमीला सोशल मीडियावर ट्रोल केले आणि त्याच्यावर उलट-सुलट आरोप केले होते. ज्यानंतर सेहवागपासून विराटपर्यंत तसेच अनेक परदेशी क्रिकेटपटूही शमीच्या समर्थनार्थ उभे राहिले होते.

First published:

Tags: Anushka sharma, India vs Pakistan, T20 cricket, T20 league, T20 world cup, Virat kohli