मुंबई, 15 एप्रिल: काही दिवसांपूर्वी दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) पृथ्वी शॉचा(Prithvi Shaw ) एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये तो आंबे चोरताना दिसला होता. तर आता त्याचा व्हिडीओ संघाने पुन्हा एकदा शेअर केला आहे. ज्यामध्ये त्या टीममधील सहकारी आंबा कसा खायचा? हे शिकवताना दिसत आहे. त्याचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने खेळाडूंचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. प्रॅक्टिस सेशनदरम्यान खेळाडू आंबे खात असतानाचा हा व्हिडिओ दिल्लीने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
मुंबईच्या पृथ्वी शॉला आंबा खाण्याचा सल्ला दिल्लीतील खेळाडूंनी दिला आहे. पृथ्वीला आंबा कसा खायचा असा प्रश्न पडला होता. त्यानंतर ललीत यादवसह इतर खेळाडूंनी पृथ्वीला आंबा कसा खायचा सांगितले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत.
आंबा खाऊन झाल्यानंतर शॉ त्याची कोय काढून त्याचा रस पिताना दिसतो. शॉच्या हातात कोय पाहून त्याला विचारले जाते की, असे हात आणि तोंड खराब करून आंबा खाऊ नये. आंब्याचा रस पिऊन शॉ संघसहकाऱ्याच्या हातात कोय देतो आणि म्हणतो की, “तू पण खाऊन घे.”
हे ही वाचा-LED स्टंपची किंमत माहिती आहे का? वाचा हार्दिकनं किती केलं BCCI चं नुकसान
काही दिवसांपूर्वी दिल्ली कॅपिटल्सने पृथ्वी शॉचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये तो आंबे चोरताना दिसला होता. दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) शेअर केलेल्या पहिल्या व्हिडिओत पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) स्टेडिअमध्ये ठेवलेले आंबे उचलून आपल्या खिशात भरताना दिसला होता. 11 सेकंदाच्या या व्हिडिओत जेव्हा त्याला कुणीतरी रोखले, तेव्हा त्याने दुर्लक्ष केले आणि सर्व आंबे उचलले. दिल्लीने हा व्हिडिओ शेअर करत “भेटा आंबे चोरणाऱ्याला” असे कॅप्शन दिले होते.
आयपीएल 2022 मध्ये खेळताना सलग 2 डावांमध्ये गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध ताबडतोब फलंदाजी करणाऱ्या शॉने या हंगामात 40 च्या सरासरीने 170 च्या स्ट्राईक रेटने 160 धावा केल्या आहेत. दिल्लीला प्लेऑफपर्यंतचा प्रवास करायचा असेल, तर शॉला महत्त्वपूर्ण भूमिका बजवावी लागेल.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.