मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

David Warner: डेव्हिड वॉर्नरही झाला पी. व्ही. सिंधूचा फॅन, फोटो पोस्ट करुन म्हणाला...

David Warner: डेव्हिड वॉर्नरही झाला पी. व्ही. सिंधूचा फॅन, फोटो पोस्ट करुन म्हणाला...

वॉर्नरकडून सिंधूचं कौतुक

वॉर्नरकडून सिंधूचं कौतुक

David Warner: ऑलिम्पिक पदकविजेती बॅडमिंटनपटून पी. व्ही. सिंधूनंही राष्ट्रकुलच्या सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. याच सिंधूचा पदक स्वीकारल्यानंतरचा फोटो वॉर्नरनं इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. आणि त्याखाली कॅप्शन देत त्यानं सिंधूचं कौतुकही केलंय.

पुढे वाचा ...
  मुंबई, 09 ऑगस्ट: ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियात चांगलाच अक्टिव्ह असतो. इन्स्टाग्राम व्हिडीओज आणि ट्विट्समुळे तो मैदानाबाहेही चाहत्यांचं मनोरंजन करतो. ऑस्ट्रेलियातच नव्हे तर क्रिकेट खेळणाऱ्या जगातल्या इतर देशातही वॉर्नरचं फॅन फॉलोईंग आहे. आयपीएलमुळे भारतातही वॉर्नरचे अनेक चाहते आहे.   हाच वॉर्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय तो त्याच्या एका पोस्टमुळे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी बजावली. त्यात ऑलिम्पिक पदकविजेती बॅडमिंटनपटून पी. व्ही. सिंधूनंही राष्ट्रकुलच्या सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. याच सिंधूचा पदक स्वीकारल्यानंतरचा फोटो वॉर्नरनं इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. आणि त्याखाली कॅप्शन देत त्यानं सिंधूचं कौतुकही केलंय.
  वॉर्नरच्या या इन्स्टाग्राम पोस्टवर आतापर्यंत साडेपाच लाख लाईक्स मिळाले आहेत. इतकच नव्हे तर डेव्हिडची पत्नी कँडिस वॉर्ननही कमेंट करत ‘खूप छान’ असं म्हटलं आहे. राष्ट्रकुलमध्ये सिंधूची सुवर्ण भरारी बर्मिंगहॅममध्ये स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारतीय बॅडमिंटनपटूंनी तीन सुवर्णपदकं पटकावली. पण सिंधूचं यश त्यात खास ठरलं. सिंधूनं राष्ट्रकुल स्पर्धेत आपला दबदबा कायम राखताना महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात कॅनडाच्या मिशेल लीचं आव्हान मोडीत काढलं. सिंधूनं ही फायनल 21-15, 21-13 अशी जिंकून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतलं आपलं पहिलं सुवर्णपदक पटकावलं. त्याआधी 2014 साली सिंधून पहिल्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं होतं. पण 2018 साली गोल्ड कोस्टमध्ये सिंघूनं एक पाऊल पुढे टाकलं. गोल्ड कोस्टमध्ये सिंधूचं सुवर्णपदक थोडक्यात हुकलं. फायनलमधल्या पराभवामुळे तिला रौप्यपदक मिळालं. पण बर्मिंगहॅममध्ये तिचं सोनेरी यशाचं स्वप्न अखेर साकार झालं. हेही वाचा - CWG 2022: बर्मिंगहॅममध्ये डौलानं फडकला तिरंगा; पाहा, राष्ट्रकुलमधली भारताची कामगिरी वॉर्नरची ऑस्ट्रेलिया अव्वल क्रिकेटचं मैदान असो किंवा इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा. प्रत्येक ठिकाणी ऑस्ट्रेलियनं खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळतो. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतही ऑस्ट्रेलियन अथलीटनं पदकांचा अक्षरश: पाऊस पाडला. ऑस्ट्रेलियानं 67 सुवर्ण, 57 रौप्य आणि 54 कांस्यपदकांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं. हॉकी आणि क्रिकेटच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडूनच भारताला पराभव स्वीकारावा लागला.
  Published by:Siddhesh Kanase
  First published:

  Tags: Cricket, David warner, Instagram, P v sindhu

  पुढील बातम्या