मुंबई, 15 मार्च : ऑस्ट्रेलियाचा अनुभवी क्रिकेटर डेव्हिड वॉर्नर सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारता विरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिका खेळल्यानंतर वॉर्नर आता भारता विरुद्ध वनडे मालिका खेळण्यासाठी मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत आल्यावर वॉर्नरने क्रिकेट प्रॅक्टिसला सुरुवात केली असून त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डेव्हिड वॉर्नरचे भारतात अनेक चाहते आहेत. वॉर्नर देखील अनेकदा आपल्या भारतीय चाहत्यांना खुश करण्यासाठी अनेक प्रकार करताना दिसतो. आज मुंबईत दाखल झालेल्या डेव्हिड वॉर्नरने बुधवारी सकाळी मुंबईच्या टॅक्सी ड्रायव्हर सोबत फोटो पोस्ट करून सर्वांचे मन जिंकले होते. अशातच आता वनडे मालिकेसाठी मुंबईत आलेल्या वॉर्नरने मुंबईच्या गल्ल्यांमध्ये लहान मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला आहे.
WPL 2023 : आरसीबीची एलिस पेरी जेव्हा डगआऊटमधला कचरा साफ करते… ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या या कृतीचं होतंय कौतुक वॉर्नरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला असून वॉर्नर एका गल्लीत लहान मुलांसोबत क्रिकेट खेळताना दिसतोय. यात वॉर्नर फलंदाजी करीत असून लहान मुलांच्या प्लास्टिक बॉलवर शॉट मारताना दिसत आहे. वॉर्नर सोबत क्रिकेट खेळताना लहानमुलं देखील खूप एन्जॉय करताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर त्याचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत.