मुंबई, 15 मार्च : भारतात सुरु असलेली महिला प्रीमियर लीग ही स्पर्धा अत्यंत रोमांचक होऊ लागली आहे. मंगळवारी हरमनप्रीतच्या मुंबई इंडियन्स संघाने स्पर्धेतील सलग पाचवा सामना जिंकून महिला आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये धडक दिली. यासह मुंबईचा संघ हा प्ले ऑफमध्ये जाणारा पहिला संघ ठरला. परंतु या दरम्यान ऑस्ट्रेलियन फलंदाज आणि रॉयल चॅलेंजर्स संघाची खेळाडू एलिस पेरी हिने पराभूत झाल्यानंतर केलेल्या एका कृतीचे सर्वस्थरातून कौतुक होत आहे. सोमवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या दोन संघांमध्ये सामना रंगला होता. आरसीबीचा संघ हा सामना जिंकून त्यांच्यावर लागलेला पराभवाचा शिक्का पुसून काढेल असे वाटत असतानाच दिल्ली संघाने अखेरच्या क्षणी सामना जिंकला. यामुळे सलग चौथ्यांदा आरसीबी संघाला पराभवाचा सामना करावा लागला. परंतु पराभवानंतर आरसीबीची खेळाडू एलिस पेरी हिने संघाच्या डगआऊटमधील कचरा साफ केला.
"Cleanliness is next to Godliness" is what we should learn.
— RCBIANS OFFICIAL WOMEN (@rcbianswomen) March 15, 2023
Legend @EllysePerry doing the thing won our hearts!
Ellyse Perry said - "I think wherever you play, you should respect".
Ellyse Perry - The 🐐#EllysePerry #RCB #WPL #WPL2023 #PlayBold pic.twitter.com/pLvW3mWCyx
आरसीबीच्या डगआऊटमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या बॉटलचा खच पडला होता. हे पाहून सामना संपल्यानंतर एलिस पेरी उठली आणि तिने डग आउट मधील बॉटल गोळा करण्यास सुरुवात केली. परंतु डग आउट मध्ये बराच कचरा होता. तेव्हा तिने चक्क कचऱ्याची पेटी हातात घेतली आणि ती तो कचरा गोळा करून त्यात टाकू लागली. एलिस पेरी हे जगातील सर्वात सुंदर खेळाडूंपैकी एक मानली जाते. आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना ही सध्या फलंदाजीत फ्लॉप ठरत असताना 32 वर्षीय एलिस पेरी ही संघासाठी महत्वाची खेळाडू बनली आहे. तिने केलेल्या या कृतीचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.