नवी दिल्ली, 27 डिसेंबर : भारताला आशियाई रौप्यपदक जिंकून देणाऱ्या स्टार बॉक्सिंगपटूचे ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न भंगणार आहे. भारताचा स्टार बॉक्सिंगपटू सुमित सांगवानवर उत्तेजक चाचणीत दोषी सापडल्यामुळं एका वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळं टोकियो ऑलिम्पिक खेळण्याचे सुमितचे स्वप्न भंगले आहे. ऑलिम्पिक आणि नॅशनल चॅम्पियन (91 किग्रा) सांगवानवर राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेकडून (नाडा) ही बंदी लादण्यात आली आहे. 10 ऑक्टोबर रोजी हिमाचल प्रदेश येथे झालेल्या चाचणीत सुमितच्या सॅम्पलमध्ये अॅसेटॅझोलामाइड या उत्तेजकांचे अंश सापडले. याआधी 2012मध्ये सुमितनं ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. वाचा- पाकमध्ये हिंदू क्रिकेटपटूचा छळ, भाजपने शेअर केला शोएब अख्तरचा VIDEO सांगवानच्या बंदीचा कालावधी 26 डिसेंबर 2019पासून सुरू झाला आहे. त्यामुळं सांगवान पुरुषांच्या ऑलिम्पिक पात्रता फेरीत भआग घेऊ शकणार नाही. पुरुषांची ऑलिम्पिक पात्रता फेरी 29-30 डिसेंबर रोजी बरेलीमध्ये होणार आहे. या फेरीत निवडले बॉक्सर 3 ते 14 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक क्वॉलिफायर स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील.
वाचा- IPL : ‘या’ श्रीलंकेच्या खेळाडूवर 27 कोटी खर्च करण्यासाठी विराट होता तयार पण… सुमितच्या बंदीबाबत नाडाचे महासंचालक नवीन अगरवाल यांनी, बंदी असलेल्या उत्तेजकांचे सेवन केल्यामुळे सुमितवर एक वर्षांची बंदी घालण्यात आली आहे,’’ असे सांगितले. सुमितच्या सॅम्पलमध्ये जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (वाडा) बंदी घातलेल्या अॅसेटॅझोलामाइड या उत्तेजकांचे अंश सापडले. त्यामुळे कलम 10.5.1 अनुसार त्याच्यावर एक वर्ष बंदी घालण्यात आली आहे. यामुळं भारताला मोठा झटका बसला आहे. सुमित ऑलिम्पिकसाठी पात्र नसल्यामुळं आता भारताकडून दुसऱ्या प्रतिभावान बॉक्सरचा शोध घेत आहेत. वाचा- गांगुलीनं आवळल्या पाकच्या मुसक्या, एकाही खेळाडूला आशिया इलेव्हनमध्ये जागा नाही महिला बॉक्सर नीरजही डोप टेस्टमध्ये नापास झाली सुमितच्या आधी आंतरराष्ट्रीय पदक विजेती भारतीय महिला बॉक्सर नीरज (बॉक्सर नीरज) यांना डोप टेस्टमध्ये अपयशी ठरल्यानंतर तात्पुरते निलंबित करण्यात आले होते. 57 किलो गटात खेळणारा नीरज कामगिरी वाढवणारी ड्रग्स लिगॅन्ड्रॉल आणि इतर अॅनाबॉलिक स्टिरॉइड्स खाल्ल्याबद्दल दोषी आढळला. यावर्षी बल्गेरियातील स्ट्रांझा मेमोरियल स्पर्धेत नीरजने कांस्यपदक आणि रशियामधील एका स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याने गुवाहाटी येथील इंडिया ओपनमध्ये सुवर्णपदकही जिंकले. 24 सप्टेंबर रोजी नीरजचे नमुने घेण्यात आले होते, ज्याची कतर येथील प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली होती.

)







