जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / कॉमनवेल्थ मेडलिस्ट पूजा सिहागच्या पतीचा संशयास्पद मृत्यू; वर्षभरापूर्वी झालेलं लग्न

कॉमनवेल्थ मेडलिस्ट पूजा सिहागच्या पतीचा संशयास्पद मृत्यू; वर्षभरापूर्वी झालेलं लग्न

पुजा सिहाग फाईल फोटो

पुजा सिहाग फाईल फोटो

बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेती कुस्तीपटू पूजा सिहाग नंदल हिचा पती अजय नंदल यांचा शनिवारी संध्याकाळी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. (Pooja Sihag’s Husband Dies)

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 28 ऑगस्ट : बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेती कुस्तीपटू पूजा सिहाग नंदल हिचा पती अजय नंदल यांचा शनिवारी संध्याकाळी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. मेहेरसिंग आखाड्याजवळ कारमध्ये ते इतर दोन पैलवान मित्रांसह पार्टी करत होते. दरम्यान, तिघांचीही प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तिथे कुस्तीपटू अजयचा मृत्यू झाला. तर अन्य दोन पैलवानांची प्रकृती चिंताजनक आहे. अजय नंदल हे रोहतकच्या गढी बोहर गावचे रहिवासी होते. सात वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. अजयच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही. पण रिपोर्ट्सनुसार, अजय आणि त्याचे जवळचे मित्र जाट कॉलेजजवळ कारमध्ये काहीतरी पित असल्याची माहिती समोर आली आहे. Ind vs Pak: विराटवरुन का भडकला लोकेश राहुल? टीकाकारांना दिलं सडेतोड उत्तर कुस्तीपटू पूजा सिहागने 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या फ्रीस्टाइलच्या 76 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकलं. पूजाने ऑस्ट्रेलियाच्या नाओमी डी ब्रुयनविरुद्धच्या लढतीत कांस्यपदक जिंकलं. त्या सामन्यात पूजा सिहागने तांत्रिक श्रेष्ठतेच्या जोरावर नाओमीचा 11-0 असा पराभव केला. पूजा सिहागने स्पर्धेत कांस्यपदक जिंकले तेव्हा तिच्या सासरच्या घरात आनंदाचे वातावरण होते. तिला सुवर्णपदक मिळेल अशी आशा संपूर्ण कुटुंबाला होती. मूळची हांसीची असलेल्या पूजाचे अजय नंदलसोबत गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये लग्न झाले होते. पूजाचे पती अजय नंदल हे देखील 2010 पासून कुस्ती खेळत होते. यासोबतच अजय सीआयएसएफमध्येही कार्यरत होते. लग्नानंतरही पूजाने नियमित सराव करणं सोडलं नाही. नोव्हाक जोकोविच पुन्हा वादात, COVID लस न घेतल्याने या स्पर्धेतूनही बाहेर 2022 च्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय संघाने न्यूझीलंडला हरवून चौथे स्थान मिळवले. भारताच्या खात्यात 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य पदके आली. ऑस्ट्रेलियाने ६७ सुवर्ण, ५७ रौप्य आणि ५४ कांस्य पदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले. दुसरीकडे, यजमान इंग्लंडने 57 सुवर्ण पदकांसह दुसरे तर कॅनडाने 26 सुवर्ण पदकांसह तिसरे स्थान मिळविले. न्यूझीलंड 19 सुवर्ण पदकांसह पाचव्या स्थानावर आहे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात