नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविच यूएस ओपन 2022 मध्ये सहभागी होऊ शकणार नाही. जोकोविच COVID-19 प्रोटोकॉलमुळे युनायटेड स्टेट्समध्ये प्रवास करण्यास अपात्र ठरला आहे. कारण त्याने अद्याप कोविड लसीकरण केलेले नाही. जोकोविचने स्वतः ट्विट करून 29 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या यूएस ओपनमधून माघार घेण्याची घोषणा केली आहे. या वर्षातील हे दुसरे ग्रँडस्लॅम आहे ज्यात जोकोविच सहभागी होऊ शकणार नाही. वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ओपनपूर्वीही जोकोविचला या कारणामुळे स्पर्धेतून बाहेर करण्यात आले होते. जोकोविचने ट्विटमध्ये लिहिले की, ‘दु:खाची गोष्ट आहे की, मी यावेळी यूएस ओपनसाठी न्यूयॉर्कला जाऊ शकणार नाही. तुमच्या प्रेम आणि समर्थनाच्या संदेशांबद्दल धन्यवाद. माझ्या सहकारी खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा! मी चांगल्या स्थितीत आणि सकारात्मक हेतू ठेवून आहे. तसेच पुन्हा स्पर्धेच्या संधीची वाट पाहणार आहे. टेनिसच्या जगतात लवकरच भेटू.
Sadly, I will not be able to travel to NY this time for US Open. Thank you #NoleFam for your messages of love and support. ❤️ Good luck to my fellow players! I’ll keep in good shape and positive spirit and wait for an opportunity to compete again. 💪🏼 See you soon tennis world! 👋🏼
— Novak Djokovic (@DjokerNole) August 25, 2022
जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या नोव्हाक जोकोविचने ही घोषणा यूएस ओपनच्या ड्रॉच्या काही तास आधी केली आहे. “नोव्हाक एक महान चॅम्पियन आहे आणि तो 2022 च्या यूएस ओपनमध्ये भाग घेऊ शकणार नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे. कारण तो यूएस नागरिकांसाठी सुरू असलेल्या लसीकरण धोरणामुळे देशात प्रवेश करू शकत नाही,” असे स्पर्धेचे संचालक स्टेसी अॅलास्टर यांनी सांगितले. नोवाकचे 2023 च्या यूएस ओपनमध्ये पुन्हा स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. हे वाचा - कशी आहे आशिया चषक विजेत्या संघाला मिळणारी ट्रॉफी? पाहा व्हिडीओ टेनिस दिग्गज जॉन मॅकेनरोने जोकोविचवरील बंदीला ‘जोक’ म्हटले आहे. मॅकेनरो म्हणाले, ‘कोरोना महामारीला अडीच वर्षे झाली आहेत. मला वाटते की जगातील सर्व भागातील लोकांना याबद्दल अधिक माहिती आहे. तरी जोकोविच येथे खेळण्यासाठी प्रवास करू शकत नाही, हे माझ्यासाठी एखाद्या विनोदासारखे आहे. गंमत म्हणजे, 2020 आणि 2021 मध्ये कोविड-19 लाटेदरम्यान जोकोविचला न्यूयॉर्कमध्ये स्पर्धा करण्याची परवानगी देण्यात आली होती. जोकोविचने 2011, 2015 आणि 2018 मध्ये यूएस ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. हे वाचा - टार्गेट पाकिस्तान… महामुकाबल्यासाठी रोहित शर्माच्या हाताशी या पाच ‘मिसाईल्स’ नदालच्या विक्रमापासून एक ग्रँडस्लॅम दूर - नोव्हाक जोकोविच गेल्या महिन्यात सातवे विम्बल्डन विजेतेपद जिंकल्यानंतर टेनिस कोर्टवर आलेला नाही. विम्बल्डन 2022 च्या माध्यमातून त्याने 21 वे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले. पुरुषांमध्ये, राफेल नदाल (22) याने जोकोविचपेक्षा एकेरी ग्रँडस्लॅम अधिक जिंकले आहेत. जोकोविचने गेल्या महिन्यात सांगितले होते की, तो यूएस ओपनमध्ये खेळण्याची तयारी करत आहे पण आता त्याचे स्वप्न भंगले आहे.