जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / CSK ला ज्याने विजय मिळवुन दिला त्याच्यावरच धोनी भर मैदानात भडकला, काय आहे कारण?

CSK ला ज्याने विजय मिळवुन दिला त्याच्यावरच धोनी भर मैदानात भडकला, काय आहे कारण?

ms dhoni (2)

ms dhoni (2)

धोनीच्या कॅप्टनसीमध्ये सीएसकेनं सनरायझर्स हैदराबादचा (CSK vs SRH) 13 रननं पराभव केला. सीएसकेचा या आयपीएल सिझनमधील हा तिसरा विजय आहे. चेन्नईच्या या विजयासोबत क्रिकटे जगतात एक वेगळीचं चर्चा सुरु झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 2 मे: धोनीच्या कॅप्टनसीमध्ये सीएसकेनं सनरायझर्स हैदराबादचा (CSK vs SRH) 13 रननं पराभव केला. सीएसकेचा या आयपीएल सिझनमधील हा तिसरा विजय आहे. चेन्नईच्या या विजयासोबत क्रिकटे जगतात एक वेगळीचं चर्चा सुरु झाली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये धोनी विजय मिळवुन देणाऱ्या मुकेश चौधरीवर (Mukesh Choudhary) भर मैदानात संतापलेला दिसत आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ 20 व्या षटकादरम्यानचा आहे. चौधरीने चेंडू लेग साइडमध्ये टाकला, ज्याला अंपायरने वाईड म्हटले. यानंतर कॅप्टन कूल गोलंदाज मुकेश चौधरीवर संतापला. यानंतर धोनीने मुकेश चौधरीला हावभावात चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर फेकण्यास सांगितले. एमएस धोनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. धोनीने स्टंप टू स्टंप टाकण्यास सांगितले- मुकेश चौधरी सामना संपल्यानंतर मैदानात घडलेल्या घटनेसंदर्भात मुकेश चौधरीने भाष्य केले. तो म्हणाला, धोनीने त्यावेळी मला काही विशेष सांगितले नाही. धोनी म्हणाला की, स्टंपवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न कर. त्याचवेळी या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) विजयात मुकेश चौधरीचा मोलाचा वाटा होता. त्याने 4 षटकात 46 धावा देत 4 बळी घेतले. त्याच्या शेवटच्या षटकात २४ धावा झाल्या. तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने (CSK) 20 षटकांत 2 बाद 202 धावा केल्या. संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने 99 तर कॉनवेने नाबाद 85 धावांचे योगदान दिले. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 182 धावांची भागीदारी झाली. सनरायझर्स हैदराबाद (SRH) कडून टी. नटराजनने 2 बळी घेतले. त्याचवेळी लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद (SRH) 20 षटकांत 6 बाद 189 धावा करू शकले. सनरायझर्स हैदराबादकडून निकोलस पूरनने सर्वाधिक ६४ धावांचे योगदान दिले. चेन्नई सुपर किंग्जसाठी हा हंगाम चांगला गेला नाही. सीएसकेने आतापर्यंत त्यांच्या 9 पैकी 6 सामने गमावले आहेत आणि फक्त तीन जिंकले आहेत. आयपीएल सिझन सुरू होण्यापूर्वी रविंद्र जडेजाची (Ravindra Jadeja) चेन्नईच्या कॅप्टनपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण, जडेजानं आठ मॅचमधील खराब कामगिरीनंतर कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे टीमने पुन्हा एकदा धोनीला कर्णधार केलं. यानंतरच्या पहिल्याच सामन्यात सीएसकेला यश मिळालं. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम नवव्या क्रमांकावर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: csk , ipl 2022 , MS Dhoni , SRH
  • First Published :
जाहिरात
जाहिरात