मुंबई, 23 फेब्रुवारी : बुधवारी सौदी अरेबिया देशाचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 300 वर्षांपूर्वी सौदी अरेबियाची स्थापना झाली असून काल या स्थापना दिवस सोहोळ्यात जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो सहभागी झाला होता. दिग्गज फुटबॉलपटू सौदी क्लब अल नसरमध्ये सामील झाल्यापासून तो अनेकदा सौदी अरेबियाच्या रितीरिवाज पाळताना दिसतो. अशातच सौदीच्या स्थापना दिवसानिमित्त रोनाल्डो अरब पोशाखात हातात तलवार घेऊन नृत्य करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हे ही वाचा : IND VS AUS : सेमी फायनल सामन्यात पाऊस पडल्यास कोणता संघ करणार फायनलमध्ये प्रवेश?
ख्रिस्तियानो रोनाल्डो तसेच सौदी क्लब अल नसरने संबंधित कार्यक्रमाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. यात रोनाल्डो अरब पारंपरिक पोशाखात दिसत असून तो सौदीच्या पारंपरिक गाण्यावर नृत्य करीत आहे. अशातच त्याच्या हातात तलवार देखील पाहायला मिळते आहे.
View this post on Instagram
لابسيـن العز والطالـة لبـوس #يوم_التأسيس pic.twitter.com/qACxqrxh5X
— نادي النصر السعودي (@AlNassrFC) February 22, 2023
पोर्तुगाल फुटबॉल संघाचा माजी कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने मागील वर्षी डिसेंबर महिन्यात सौदी अरेबियाच्या अल नासर या क्लबसोबत अडीच वर्षांचा करार केला आहे. 37 वर्षीय रोनाल्डोने 2025 पर्यंत अल नसरशी करार केला असून त्यांनी सुमारे 200 दशलक्ष युरो म्हणजे 1775 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा करार केला आहे. यासह तो जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. हा करार केल्यानंतर रोनाल्डो त्याच्या संपूर्ण कुटुंबासह सौदीमध्ये वास्तवास आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Football, Saudi arabia, Sports